९० च्या दशकामध्ये आलेल्या आशिकी चित्रपटामधून प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेली अनु अग्रवालला आज देखील लोक पसंद करतात. नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने २००१ मध्ये आपण निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने म्हंटले आहे कि ती इंटीमेसीला प्रेमासोबत काम्पेयर करत नाही.
बॉलीवूड जगतापासून दूर योग साधनामध्ये लीन होणार अनुने नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हंटले आहे कि ती लाईफमध्ये नेहमीच ओपन राहिली आहे आणि ती प्रेमाला वेगळ्या प्रकारे पाहते. मुलाखतीदरम्यान बोलताना अनु म्हणाली कि माझ्या आशिकीला काय झाले आहे ? मी खूपच मोकळ्या मनाची व्यक्ती आहे. मी नेहमीच ओपन पर्सन राहिली आहे. प्रेमाबद्दल बोलायचे झाले तर कोणालाच माहिती नसते कि पुढे काय होणार आहे आणि फ्यूचरमध्ये काय लिहिले आहे.
अनुचा १९९९ मध्ये कार अपघात झाला होता. ज्यानंतर ती २९ दिवस कोमामध्ये होती. अनु सध्या एक मेंटन हेल्थ फाउंडेशन चालवते. बातचीतमध्ये अनु म्हणाली कि माझ्या लै गिक गरजा खुच आधी संपल्या आहेत. मला फाउंडेशनमधील मुलांकडून खूप प्रेम मिळाले आहे. हे सर्वात पवित्र आणि निरागस प्रेम आहे.
माझ्या लाईफमध्ये प्रेमाची गरज खूपच आधी संपली आहे. हि शा रीरि क सं बंधाची गोष्ट नाही. ते तर कधीच संपले होते. ते प्रेम नाही. प्रेमाचा जो कॉन्सेप्ट आहे तो बदलला आहे. प्रेम छोट्या छोट्या गोष्टीमध्ये देखील मिळते. मी प्रेम आणि से क्स ला बरोबर समजत नाही.
अनु अग्रवाल नुकतेच इंडियन आयडॉल शोमध्ये दिसली होती. यानंतर तिने कम्प्लेंट देखील केली होती कि शोने तिचे सिन्स कट केले आहेत. यावर खूप वाद देखील झाला होता. अनुने चॅनलवर आरोप करताना म्हणाली होती कि मी स्टेजवर गेले आणि लोकांच्या टाळ्या वाजवल्या. ही पूर्ण कृतज्ञता होती. मी देवाचा विचार करत होते. कुमार सानूने टाळ्या वाजवल्या, सर्वजण उभे राहून टाळ्या वाजवल्या. हे सर्व डिलीट केले गेले. मला डिफेंसिव झोनमध्ये जायचे नाही. चॅनलला देखील यासाठी ब्लेम करण्याची माझी इच्छा नाही. मी सेल्फ मेड आणि सेल्फ हील गर्ल आहे.