HomeBollywoodआलिया भट्टने तीन वर्षांपूर्वीच होणाऱ्या मुलीच्या नावाचा केला होता खुलासा, ‘हे’ असेल...

आलिया भट्टने तीन वर्षांपूर्वीच होणाऱ्या मुलीच्या नावाचा केला होता खुलासा, ‘हे’ असेल मुलीचे नाव…

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आईवडील झाले आहेत. आलियाने रविवारी आपल्या पहिल्या बाळाच्या रुपामध्ये एक बेबी गर्लला जन्म दिला आहे. आलियाची आई बनण्याची बातमी सोशल मिडियावर येताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलीवूडपासून ते साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील मोठमोठे सुपरस्टार आलिया आणि रणबीरला सुभेच्छा देत आहेत.

बेबी गर्लच्या जन्मानंतर आता आलिया-रणबीर त्यांच्या मुलीच्या नावामुळे देखील सोशल मिडियावर चर्चेत आले आहेत. त्याचबरोबर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती एका नावाबद्दल बोलताना दिसत आहे आणि सांगत आहे कि तिला हेच नाव तिच्या मुलीचे ठेवायचे आहे.

वास्तविक २०१९ मध्ये आलिया भट्ट रणवीर सिंहसोबत गली बॉय चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सुपर डांसर ३ च्या मंचावर आली होती. जिथे सक्षम नावाच्या एका कंटेस्टेंटला जेव्हा आलिया भट्टच्या नावाचे स्पेलिंग विचारले गेले तेव्हा त्यांनी आलियाचे स्पेलिंग चुकीचे सांगत अलमा केले होते. ज्यावर शोमध्ये एकच हशा पिकला होता. पण आलियाने यावर बोलताना म्हंटले होते कि अलमा खूपच सुंदर नाव आहे आणि मी माझ्या मुलीचे नाव अलमाच ठेवेन. आलियाचा हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे.

आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल कि आलिया भट्ट व्हिडीओमध्ये म्हंटल्याप्रमाणे मुलीचे नाव ठेवते का तिच्या आणि रणबीरच्या नावाचे कॉमिनेशन करून तिच्या लहान राजकुमारीचे नाव ठेवते. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले होते.

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने आपल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती आणि आता नोव्हेंबरमध्ये तिने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. असे म्हंटले जात आहे कि आलिया आणि रणबीर अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या जवळ आले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts