तुम्हाला अजून देखील तुमचे बालपण आठवते का? जर होय तर तुम्हाला तुमच्या लहानपणी खरेदी केलेल्या वस्तूंच्या किंमती देखील माहिती असतील. इतकेच नाही तर आपल्या आजोबांच्या काळामधील वस्तूंच्या किमतींबद्दल देखील ऐकले असेल. तथापि काही पुरावे लोकांना हैराण करण्यासाठी आज देखील जिवंत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर असेच एक बिल व्हायरल होत आहेत. जेव्हा लोकांना कमी किमतीमध्ये महागड्या वस्तू मिळत होत्या. आजच्या वस्तूंची तुलना करता लोक आश्चर्यचकित झाले आहेत कारण महागाईच्या जमान्यामध्ये असे कधीच संभव होणार नाही.
सोशल मिडियावर एक जुनी स्लीप व्हायरल होत आहे ज्याला पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. जवळ जवळ ९० वर्षांपूर्वी कलकत्तामध्ये एका सायकल दुकानामध्ये एका व्यक्तीने सायकल खरेदी केली होती, ज्याच्या किमतीचा अंदाज कोणालाही नसेल. त्यावेळी सायकलची किंमत फक्त १८ रुपये होती. हे बिल ७ जानेवारी १९३४ चे आहे. या बिलाचा फोटो फेसबुकवर संजय खरे नावाच्या एक युजरने शेयर केला आहे.
जुने बिल शेयर करताना संजय खरे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, एकेकाळी सायकल हे माझ्या आजोबांचे स्वप्न राहिले असेल. सायकलच्या चाकाप्रमाणे वेळेचे चक देखील किती फिरले आहे. या स्लीपमध्ये पाहू शकता कि शॉपचे नाव कुमुद सायकल वर्क्स लिहिले आहे. या दुकानाचा पत्ता शॉप नंबर- ८५ ए, मानिकताला, कलकत्ता असा आहे. त्याचबरोबर हे देखील पाहू शकता कि यावर रिपेयरिंग स्पेशलिस्ट देखील लिहिले आहे. पोस्ट वर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे कि याला जपून ठेवणे खूप मोठी गोष्ट आहे. पैशाची किंमत त्याच्या जागी आहे आणि आठवणी अनमोल असतात.