१९६१ च्या हुंडा बंदी कायद्यानुसार भारतात हुंडा देणे आणि घेणे बेकायदेशीर आहे. भारतीय दंड संहितेनुसार हुंडा मागताना कोणी पकडले गेले तर त्याला किमान ७ वर्षाची शिक्षा केली जाते. हुंडा विरोधी इतका कडक कायदा असून देखील भारताच्या अनेक ग्रामीण भागांमध्ये हि प्रथा सुरु आहे. असेच एक प्रकरण सध्या खूप चर्चेचा विषय ठरले आहे. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यामध्ये स्थित ढींगसारा गावामधील चार भवानी आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये ८ करोड ३१ लाख रुपये इतकी रक्कम हुंड्यामध्ये दिली आहे.
नागौर जिल्हा हुंड्याची प्रथा मायरासाठी नवीन नाही. पण या चार भवानी इतकी मोठी रक्कम हुंड्यामध्ये देऊन एक इतिहास रचला आहे, जे पहिले कोणी केले नव्हते. चार भाऊ अर्जुन राम महरिया, भागीरथ महरिया, उम्मेद जी महरिया, आणि प्रल्हाद महरियाने २६ मार्च रोजी बहिण भंवरी देवीसगे लग्न केले होते.
हे ऐकल्यानंतर सर्व लोक हैराण झाले आहेत. माहितीनुसार हुंड्यामध्ये २.२१ करोड रुपये रोख, १०० एकर जमीन ज्याची किंमत ४ करोड आहे, गुढ़ा भगवानदास गावामध्ये ५० लाखाची १ एकर जमीन, ७० लाख रुपये किमतीचे १ किलो सोने, १४ किलो चांदी, ज्याची किंमत ९.८ लाख रुपये आहे, उर्वरित ८०० नाणी गावामध्ये वाटली गेली. एक ट्रॅक्टर देखी हुंड्यामध्ये देण्यात आला आहे ज्याची किमत ७ लाख रुपये आहे.
इतकेच नाही तर भावांनी वरासाठी इतर वाहनांसोबत एक स्कूटर देखील दिली आहे, जे शेकडो बैलगाड्या आणि उंटगाड्यांच्या मदतीने धींगसारा गावामधून रायधनू गावामध्ये आणले गेले. सध्या हुंड्याची हि बातमी ढींगसारा गावामध्ये खूपच चर्चेचा विषय ठरली आहे. वरात पाहण्यासाठी विवाहस्थळी मोठ्या संख्येने लोक जमले होते. याआधी बुरदी गांव निवासी भंवरलाल चौधरीने ३ करोड २१ लाखाचा हुंडा दिला होता. भंवरलालने आपल्या बहिणीच्या विवाह समारंभाच्या प्रसंगी वराला एक सजवलेली चुनी दिली. पण आता भागीरथ महरियाच्या कुटुंबाचे हा विक्रम मोडीत काढला आहे.