HomeViralकधी काळी चॉकलेटच्या किंमतीत मिळत होतं ‘सोनं', ६० वर्षे जुने बिल पाहून...

कधी काळी चॉकलेटच्या किंमतीत मिळत होतं ‘सोनं’, ६० वर्षे जुने बिल पाहून आश्चर्यचकित व्हाल…

सध्या सोन्याचा भाव इतका वाढला आहे कि सामान्य माणसाला सोने खरेदी करणे खूपच अवघड आहे. सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या असल्या तरी महिलांची सोन्याची आवड काही कमी झालेली नाही. सोने न घालता महिलांचा शृंगार पूर्ण होऊच शकत नाही. पण सध्या सोन्याच्या भाव रेकॉर्ड ब्रेक करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का कि खिशाला न परवडणारे सोने कधी काळी एका चॉकलेटच्या किंमतीमध्ये मिळत होते. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर ६० वर्षे जुने बिल पहा. बिल पाहिल्यानंतर तुम्ही आपसूकच डोके धराल.

सोशल मिडियावर सध्या ६० वर्षे जुने एक बिल व्हायरल होत आहे जे ज्वेलरी खरेदीचे आहे. ज्यामध्ये सोन्याची किंमत पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. १९५९ मध्ये महाराष्ट्राच्या ज्वेलरी शॉपच्या बिलामध्ये सोन्या-चांदीचे भाव एका चॉकलेटच्या किंमतीपेक्षा देखील कमी असल्याचे पाहून लोक दंग झाले आहेत.

सोशल मिडियावर १९५९ चे एक ज्वेलरी बिल खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तोळे सोन्याचा भाव पाहून लोकांचे होश उडाले आहेत. बिलामध्ये एक तोळे सोन्याचा भाव फक्त ११३ रुपये होता. तर आज एक तोळे सोन्याचा जितका भाव आहे त्यामध्ये ६० वर्षांपूर्वी १०० ग्राम सोने खरेदी करू शकत होता. व्हायरल बिल महाराष्ट्राच्या एका वामन निंबाजी अष्टेकर नावाच्या शॉपचे आहे. ज्यामध्ये सोन्या-चांदीचे बिल देखील दिले आहे.

ज्वेलरीचे बिल ३ मार्च १९५९ चे आहे जे शिवलिंग आत्माराम नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे. ज्यांनी ६० वर्षांपूर्वी ११३ मध्ये सोने खरेदी केले होते. त्याचबरोबर चांदी देखील घेतली होती. ज्याचे एकूण बिल ९०९ रुपये झाले होते. इतक्यामध्ये तर आता सोने खरेदी करण्याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही.

तथापि हे बिल पाहिल्यानंतर लोकांना त्या काळाला गोल्डन टाईम म्हणण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही. कारण आजच्या काळामध्ये तर सोन्याचा हा भाव फक्त एक स्वप्न आहे. कारण तज्ज्ञांच्या मते, लवकरच सोने 60 हजारांच्या पुढे जाणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts