HomeCricketभारतीय दिग्गज खेळाडू ज्यांना IPL मध्ये एकही शतक झळकावता आले नाही, भारतासाठी...

भारतीय दिग्गज खेळाडू ज्यांना IPL मध्ये एकही शतक झळकावता आले नाही, भारतासाठी २० शतके ठोकणारा देखील आहे यामध्ये सामील…

आयपीएल सुरु झाले आहे. आयपीएलमध्ये दररोज एक ना एक खेळाडू शतक झळकावलेला पाहायला मिळतो. आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले गेले आहेत. पण अजून एकाने देखील शतक ठोकलेले नाही. टी-२० फॉरमॅटमध्ये शतक ठोकणे इतके सोपे काम नाही. आज आपण अशा काही दिग्गज क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना आयपीएलमध्ये अजून देखील शतक झळकावता आलेले नाही. भारतासाठी २० शतके ठोकणाऱ्या खेळाडूचे देखील यामध्ये नाव सामील आहे.
सर्वात पहिला नाव येते ते रॉबिन उथप्पाचे. ज्याने आयपीएलमध्ये एकूण २०५ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४९५२ धावा केल्या आहेत. त्याचा सर्वात मोठा स्कोर ८८ राहिला आहे. पण त्याने अजूनपर्यंत आयपीएलमध्ये एक देखील शतक झळकावलेले नाही.
महेंद्रसिंग धोनीचे नाव देखील या खेळाडूंमध्ये येते. ज्याने अद्याप देखील आयपीएलमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. धोनीने २३५ सामन्यांमध्ये एकूण ४९९२ धावा केल्या आहेत. त्याची नाबाद ८४ हि सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याला आयपीएलमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही.
युवराज सिंगने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने २००८ ते २०१९ पर्यंत आयपीएल खेळले आहे. त्याने १३२ सामन्यात २७५० धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ८३ होती. आयपीएलमध्ये त्याला एकही शतक झळकावता आले नाही.
दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये आतापर्यंत २२९ सामने खेळले आहेत. त्याने २२९ सामन्यात एकूण ४३७६ धावा केल्या आहेत. नाबाद ९७ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. मात्र शतक झळकावताना तो हुकला. आयपीएलमध्ये त्याचे एकही शतक नाही. याशिवाय त्याने २० अर्धशतके केली आहेत.
या लिस्टमध्ये पाचवे नाव अनुभवी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे येते. गौतम गंभीरने भारताला २ विश्वचषक जिंकून दिले. त्याने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० शतके झळकावली. पण आयपीएलमध्ये एकही शतक झळकावता आले नाही. आयपीएलमध्ये त्याने १५४ सामन्यांमध्ये ४२१७ धावा केल्या. गंभीरने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts