आजकाल वाढत्या महागाईमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. मग ते पेट्रोल डिजेल बद्दल असो अथवा खाण्यापिण्याच्या वस्तू. परंतु एक काळ असा होता कि या सर्व गोष्टी खूप स्वस्त होत्या. असाच एक पदार्थ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ज्याला पाहून स्पष्टपणे समजते कि एकेकाळी मिठाई आणि समोस्याची किंमत खूप कमी असायची. हे मेनू कार्ड पाहून तरुणाईला आश्चर्य वाटून ते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या मेनू कार्ड मध्ये दिसत आहे कि ज्या रसमलाई चा एक पीस आज ३० ते ४० रुपयांपर्यंत मिळतो, तो एकेकाळी फक्त १ रुपयाला एक पीस मिळत होता. अशाचप्रकारे आजकाल १२ – १५ रुपये प्रती पीस मिळणारा समोसा फक्त ५० पैश्यांना खरेदी करून खात असत.
अशाच प्रकारे आजकाल ३०० – ४०० रुपये किलो मिळणारा गुलाब जामून फक्त १४ रुपये किलो ला खरेदी करून संपूर्ण कुटुंब खात असे. जवळपास २५० – ३०० रुपये प्रती किलो मिळणारा मोतीचूरचे लाडू ला देखील त्यावेळी जवळपास १० रुपये प्रती किलो मध्ये खरेदी करू शकत होते. हे मेनुकार्ड वर्ष १९८० मधील आहे.
लोक या मेनुकार्ड वर आपल्या चकित करणाऱ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका तरुण इंटरनेट युजर ने लिहिले आहे कि, काय खरोखर या सर्व वस्तू एवढ्या स्वस्त मिळत होत्या. दुसऱ्या एका युजर ने लिहिले कि, तो जुना काळ पुन्हा एकदा परत यावा अशी माझी इच्छा आहे, किती मजा येईल. एका व्यक्तीने लिहिले आहे कि, वर्ष १९८० मध्ये त्यांचा पगार १००० रुपये होता, जो आज वाढून १ लाख रुपये झाला आहे. परंतु महागाई त्यापेक्षाही वाढून अनेक पटीने वाढली आहे.