बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा सध्या तिच्या आगामी निकम्मा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान घेतल्या जाणाऱ्या मुलाखतींदरम्यान शिल्पा आपले अनेक किस्से उघड करत आहे. अशाच एका मुलाखतीदरम्यान तिने आपल्या क्रशचे देखील नाव सांगून टाकले. त्याचबरोबर तिने आपल्या आईसोबतचा लहानपणीचा एक किस्सा देखील शेयर केला.

.

मुलाखतीदरम्यान शिल्पा लहानपणीचा किस्सा सांगताना म्हणाली कि, माझ्या आईने जेव्हा माझा निकाल पाहिला होता तेव्हा ती मला निक्कमी म्हणाली होती आणि एकदम बेकार असे देखील म्हणाली होती. शिल्पा पुढे म्हणाली कि, जेव्हा माझ्या आईने मला निकाल पाहिला तेव्हा मला ती खूप ओरडली होती आणि मला म्हणाली कि तू खूपच वाईट आणि निरुपयोगी होत चालली आहेस.

यादरम्यान शिल्पा शेट्टीने आपल्या क्रश बद्दल देखील सांगून टाकले. शिल्पा शेट्टी म्हणाली कि माझा क्रश दुसरा तिसरा कोणी नसून बॉलीवूडचा हँडसम हंक कार्तिक आर्यन आहे. शिल्पाला बॉलीवूडमधील कोणता व्यक्ती जास्त आवडतो असे विचारल्यानंतर तिने हे उत्तर दिले.

.

यादरम्यान शिल्पाने एक रॅपिड-फायर राउंड खेळला ज्यामध्ये तिने अनेक मनोरंजक किस्से देखील सांगितले. शिल्पाचा निकम्मा चित्रपट १७ जून रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटामध्ये शिल्पासोबत अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेटिया देखील मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने