बॉलीवूडची फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टीने नुकताच आपला ४७ वा वाढदिवस साजरा केला आहे. ८ जून १९७५ रोजी मंगळूर येथे जन्मलेली शिल्पा शेट्टीने आपल्या फिल्मी करियरमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये अनेक उतार-चढाव पाहिले आहेत.

तिने सर्व अडचणींचा धीराने सामना केला. शिल्पा शेट्टीला प्रेमात धोका मिळाल्यानंतर तिने सर्वकाही गपचूप सहन केले. तिने सर्वांसमोर येऊन अक्षय कुमारचे पितळ उघडे पाडत त्याच्यावर गंभीर आरोप लावले होते.

१९९४ मध्ये मैं खिलाड़ी तू अनाड़ी चित्रपटादरम्यान अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीची पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीमध्येच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या अफेयरच्या चर्चा त्यावेळी खूपच मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या.

तीन वर्षे दोघे एकमेकांच्या रिलेशनमध्ये राहिले आणि अक्षय कुमारने असे कांड केले कि २००२ मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. माहितीनुसार अक्षय कुमारने शिल्पाला लग्नासाठी देखील प्रपोज केले होते पण अक्षय कुमारने एक अट ठेवली होती.

अट अशी होती कि लग्नानंतर शिल्पाला अॅक्टिंग सोडावी लागेल. त्यावेळी शिल्पाला फार मोठा धक्का बसला होता. काही रिपोर्टनुसार असे देखील म्हंटले जाते कि राजेश खन्नाची मुलगी ट्विंकल खन्नाहसाठी शिल्पाला सोडून दिले होते. ज्यानंतर शिल्पाने अक्षय कुमारवर गंभीर आरोप लावले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने