नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटामधील आर्चीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री रिंकू राजगुरूला वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटामुळे रिंकू राजगुरू रातोरात फेमस झाली होती. आज देखील तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. लोक तिला अजून देखील आर्ची नावानचं ओळखतात.

सध्या रिंकू राजगुरू तिच्या आगामी येणाऱ्या चित्रपटामुळे खूप चर्चेमध्ये आहे. ज्यामधील लुक तिने नुकताच सोशल मिडियावर शेयर केला होता. यादरम्यान रिंकूने नुकतेच तिचे लाल साडीमधील काही सुंदर फोटो सोशल मिडियावरून शेयर केले आहेत.

.

रिंकू राजगुरूने शेयर केलेले हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. चाहत्यांकडून तिच्या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. पण सध्या तिच्या फोटोपेक्षा तिच्या फोटोवर एका चाहत्याने केलेली कमेंट चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.

रिंकूच्या या फोटोवर चाहत्याने भन्नाट कमेंट केली आहे, त्याने म्हंटल आहे कि, ‘अर्ची संध्याकाळी माझ्या घरी ये ह्याच साडीमध्ये तुझ्यासाठी पूर्ण पोळी बनवायला सांगतो घरी. चाहत्याने केलेली हे कमेंट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचे काम करत आहे.

चाहत्यांनी तिच्या या सुंदर फोटोंवर हार्ट इमोजीचा अक्षरशः पाऊसच पाडला आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरूने मराठी चित्रपटांसोबत हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर ती वेबसिरीज मध्ये देखील पाहायला मिळाली आहे.


रिंकू साडीमध्ये असो किंवा वेस्टर्न ड्रेसमध्ये तिचा लुक नेहमी खुलून दिसतो. रिंकू विशेषकरून साडीमध्ये तिचे जास्त फोटो शेयर करत असते. तिच्या साडीमधील लुकची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. नुकतीच ती झुंड चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळाली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने