अभिनेत्री नुसरत भरुच्या तिच्या जनहित में जारी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये तिने कं’डो म’चा मुद्दा उपस्थित केला आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री नुसरत भरुचा कं’ डोम विक्रेत्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

पुरुषांपेक्षा महिलांना त्याची जास्त गरज असल्याचे नुसरत भरुचाने यावेळी विधान केले आहे ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जर मुलांकडे कं’डो म’ नसेल तर मुलींनी सॅनिटरी पॅड्सप्रमाणे नेहमी आपल्यासोबत कं’डो म’ ठेवावे असे देखील ती यावेळी म्हणाली.

‘जनहित में जारी’ हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट असल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये नुसरत भरुचा सेल्स गर्लच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. चित्रपटामध्ये नुसरत ज्या कंपनीमध्ये काम करत आहे त्या कंपनीमध्ये एक देखील मुलगी कामाला नसते.

तिथे सर्व मुलेच काम करतात. त्यामुळे तिने केलेल्या भूमिकेमध्ये तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी देखील नुसरतला असेच समस्यांचा सामना करावा लागला. नुसरत भरुचाला तिच्या या भुमिकेमुळे चांगलेच टार्गेट केले.

नुसरत भरुचाचा हा चित्रपट येत्या शुक्रवारी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. नुसरत पुढे म्हणाली कि कं’डो म’ किती महत्वाचे आहे हे मला चित्रपटाच्यावेळी संशोधन करताना समजले. पण त्याचे महत्व त्याहूनदेखील अधिक आहे. खरेतर याची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.

नुसरत म्हणाली कि जर पुरुषांनी याचा वापर केला नाही तर त्याचा परिणाम महिलांना भोगावा लागतो. त्यामुळे गर्भपाताचा धोका देखल वाढतो. जनहित में जारी चित्रपटाचे दिग्दर्शन जय बसंतू सिंह यांनी केले आहे. चित्रपटामध्ये विजय राज, टिनू आनंद आणि ब्रिजेंद्र काला सारखे कलाकार नुसरत भरुचासोबत पाहायला मिळणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने