बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या हटके अभिनयाच्या जोरावर ठसा उमटवणारे नाना पाटेकर यांनी बॉलीवूड स्वताची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूड कलाकारांच्या तुलनेत देखणेपानाच्या व्याख्येत न बसणारे नाना हे त्यांच्या अभिनयामुळे दर्शकांच्या पसंतीस उतरले.

नानांच्या चित्रपटांना प्रेक्षकवर्ग देखील तुफान मिळतो. त्यांचे चित्रपट आवर्जून पाहिले जातात. या सगळ्यामध्ये नानाच्या मुलाने देखील याच क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नानांचा मुलगा मल्हार आणि नानांच्या चाहत्यांचा फारसा परिचय नाही.

पण नानांचा मुलगा मल्हारने देखील नानांच्या पावलावर पाउल ठेवण्याची तयारी सुरु केली आहे. खरे तर यापूर्वी जेव्हा राम गोपाल वर्मा यांच्या २६/११ चित्रपटाचे शुटींग सुरु होते तेव्हा मल्हारने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली होती.

मल्हारला प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या एका चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती पण प्रकाश झा आणि नाना यांच्या वादाचा फटका मल्हारला बसला. पण आता त्याने नव्या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचा निर्णय घेतला आहे.

मल्हार हा नानाचा सेम टू सेम कॉपी असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. नानांनी अभिनेत्री आणि ऑफिसर नीलकांती पाटेकर यांच्यासोबत लग्न केले होते. त्यांना मल्हार नावाचा एक मुलगा आहे. मल्हारने मुंबईमधील सरस्वती मंदिर मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

त्यानंतर त्याने कॉमर्सची पदवी संपादन केली. लहानपणापासूनच मल्हारला अभिनयाची आवड होती पण त्याला तशी योग्य संधी मिळाली नाही. आता मल्हारने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस तयार केले असून त्याला आपले वडील नाना पाटेकरांचेच नाव दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने