बॉलीवूड कलाकारांचे आयुष्य जितके हेवा वाटण्याजोगे असते तितकेच ते प्रत्यक्षात नसते. कारण या कलाकारांना देखील अडचणींचा, आव्हानांचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे त्यामधून सावरून दर्शकांचे मनोरंजन करावे लागते.

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये ९० च्या दशकामधील आपल्या अभिनयाने दर्शकांचे मन जिंकणाऱ्या आणि अभिनेता शाहरुखसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेयर करणाऱ्या या अभिनेत्रीला पाहिल्यानंतर याचा अंदाज नक्कीच येतो.

बॉलीवूची हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून महिमा चौधरी आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेते अनुपम खेर यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये महिमाने तिला स्त नां’चा क र्क’रो’ग झाल्याचे सांगितले होते.

उपचार करून झाल्यानंतर तिच्या झालेल्या परिस्थितीचे तिने वर्णन केले होते. अभिनेते अनुपम खेर यांनी देखील तिला एक सुपरहिरो असल्याचे संबोधले होते. क र्क’रोगाच्या आजारान खचण्याच्या अगोदर महिमाला अशाच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले होते.

अभिनेत्री महिमा चौधरीचा मोठा अपघात झाला होता ज्यामुळे तिला शारीरिक आणि मानसिक त्रास झाला होता. १९९९ मध्ये महिमा आपल्या दिल क्या करे चित्रपटाच्या शुटींगसाठी बेंगळूरला गेली होती. यादरम्यान तिचा मोठा अपघात झाला होता.

त्यावेळी महिमाची अवस्था खूपच गंभीर होती. अपघातानंतर तिने पहिल्यांदाच आपला चेहरा आरश्यामध्ये पाहिला होता तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिच्या चेहऱ्यावर जिकते तिकडे फक्त टाकेच टाके दिसत होते.

डॉक्टरांनी तिच्या चेहऱ्यामधून तब्बल ६७ काचांचे तुकडे शस्त्रक्रिया करून काढले होते. यानंतर तिने बरेच दिवस आपला चेहरा देखील पाहिला नव्हता. हि घटना घडण्याअगोदर तिला अनेक चित्रपटांची ऑफर मिळाली होती. पण नंतर तिला या सर्व चित्रपटांना मुकावे लागले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने