आज ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रथम बुधवार आहे. आजच्या दिवशी सोपपदा व्रत केले जाते आणि कापूर तुपामध्ये बुडवून पूर्ण घरामध्ये धूर केल्यास वाईट शक्ती दूर होऊन सकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करते. हिंदू धर्मामध्ये पूजा किंवा आरतीमध्ये कापुराचा वापर केला जातो.

कापुराचे औषधी गुणधर्मदेखील आहेत आणि जीवनामधील समस्यांचे उपाय करण्यासाठी देखील कापुर खूप प्रभावशाली आहे. कापूर पांढऱ्या रंगाचा असतो आणि शुक्रवारी पांढऱ्या रंगाचा प्रयोग केल्यास समृद्धी आणि प्रगतीची प्राप्ती होते.

घरामध्ये जर सकारात्मक उर्जा आणि शांती प्राप्त करायची असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर तुपामध्ये भिजवून जाळावा आणि संपूर्ण घरामध्ये त्याचा सुगंध पसरवावा. असे केल्याने घरामधील नकारात्मक उर्जा नष्ट होते.

वाईट स्वप्ने येणार नाहीत आणि घरामध्ये शांती बनून राहील. याचा सुगंध जीवाणू, विषाणू इत्यादी आजार पसरवणे जीव देखील नष्ट करतात आणि ज्यामुळे घरामधील वातावरण शुद्ध होते आणि आजार पसरण्याची भीती राहत नाही.

एका गुलाबाच्या फुलामध्ये कापुराचा तुकडा ठेवावा आणि संध्याकाळी फुलामध्ये एक कापूर जाळावा आणि हे फुल दुर्गामाताला अर्पित करावे. यामुळे धन प्राप्ती होते. हे काम कोणत्याही महिन्याच्या प्रथम शुक्लपक्षच्या शुक्रवारी सुरु करून ४३ दिवस करावे लाभ मिळेल.

जर घरामध्ये एखाद्या स्थानी वास्तू दोष निर्मित होत असेल तर तिथे एक कापूरचा तुकडा ठेवावा. जेव्हा तो कापुराचा तुकडा विरघळून समाप्त होईल तेव्हा दुसरा तुकडा तिथे ठेवा. अशाप्रकारे करत राहिल्यास वस्तूदोष निर्मित होणार नाही.

पाण्यामध्ये कापुराच्या तेलाचे काही थेंब टाकून अंघोळ करावी. हे आपल्याला ताजेतवाने तर ठेवतेच पण त्याचबरोबर आपले भाग्य देखील चमकवते. जर यामध्ये चमेलीच्या तेलाचे काही थेंब टाकले तर यामुळे राहू, केतू आणि शनी दोष राहणार नाही. पण असे फक्त शनिवारी करावे.

रूममध्ये संध्याकाळी २ कापुराचे तुकडे जाळावे. यामुळे मन शांत राहील आणि तणाव देखील दूर होईल. जर असे करायचे नसेल तर दररोज शयनकक्षामध्ये कापूर जाळावा आणि कापुराच्या २ तुकडे शयनकक्षामध्ये ठेवावे.

रात्रीच्या वेळी स्वयंपाकघर आवरल्यानंतर चांदीच्या वाटीमध्ये लवंग तथा कापूर जाळावा. हे कार्य दररोज करावे. धनधान्याची कमी कधीच होणार नाही. विवाहामध्ये बाधा येत असेल तर ३६ लवंग आणि ६ कापुराचे तुकडे घ्यावे आणि यामध्ये हळद आणि तांदूळ मिसळून माता दुर्गाला आहुती द्यावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने