झोप प्रत्येकासाठी प्रिय असते. आपण रात्री तर झोपत असतोच पण कधी कधी आपण दुपारच्या वेळी देखील मनसोक्त झोप घेतो. मानसिक आणि शारीरिक ताण कमी करण्यासाठी झोप खूप महत्वाची असते. ज्या लोकांना पडल्या पडल्या झोप येते असे लोक खूपच लकी असतात.

हे सगळ ठीक आहे पण काही लोक एकाच स्थितीमध्ये झोपतात. आपल्या शरीराची स्थिती हि आपल्या व्यक्तिमत्वासोबत जोडलेली असते. एका सर्वेक्षणानुसार तुमच्या झोपेची स्थिती हि तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असते कसे ते जाणून घेऊया.

पाठीवर झोपणारे लोक: तुम्ही अनेक वेळा पाठीवर झोपत असाल तर तुम्हाला लक्ष केंद्रित करून घ्यायला खूप आवडते. असे लोक खूपच आशावादी असतात आणि समविचारी लोकांच्या सहवासामध्ये खूपच आनंदी राहतात. हे लोक सगळ्यांमध्ये असल्यास लगेच ओळखले जाऊ शकतात.

असे लोक स्वतःकडून अपेक्षा तर ठेवतातच पण इतरांकडून देखील यांना मोठ्या अपेक्षा असतात. न पटणाऱ्या बोलण्याकडे असे लोक साफ दुर्लक्ष करतात. अशा लोकांना खोटे बोललेले जरासुद्धा आवडत नाही. असे लोक आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतात.

एका अंगावर झोपणारे लोक: जे लोक एका अंगावर झोपतात असे लोक खूप शांत स्वभावाचे असतात. हे लोक नेहमी आपल्या कामामध्ये अॅक्टीव्ह राहतात. अशा लोकांना आपल्या भविष्यकाळाबाबत विचार करण्याची सवय असते. हे लोक कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला जुळवून घेतात.

कठीण परिस्थितीमध्ये देखील स्मित हास्याने आणि संयमाने काय करतात. असे लोक स्वतःच्या मतावर नेहमी ठाम राहतात. या लोकांना इतरांना मदत करायला खूप आवडते. आपल्या कुटुंबातील लोकांना असे लोक जास्त महत्व देतात.

पाय किंवा गुडघे जवळ घेऊन झोपणे: अशा लोकांना सुरक्षित वातावरणाची जास्त गरज असते. अशा लोकांना वाटते कि इतरांनी आपली काळजी घ्यावी. असे लोक जास्त बोलके नसल्यामुळे त्यांना इतरांशी संवाद साधण्यास अडचणीचा सामना करावा लागतो. हे लोक फक्त आपल्या कुटुंबासोबत जास्त कम्फर्टेबल असतात. अशा प्रकारे झोपणारे लोक इतर लोकांमध्ये जास्त मिसळत नाही. त्यांना एकटे राहणे जास्त आवडते. असे लोक खूपच भावनिक आणि भित्रे असतात.

पोटावर झोपणरे: अनेक लोकांना पालथ झोपायची सवय असते. असे लोक इच्छाशक्तीने खूपच मजबूत असतात. त्यांना आव्हाने घेण्याची सवय असते. असे लोक खूप साहसी देखील असतात. या लोकांना इतरांना मार्गदर्शन करायला खूप आवडते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने