नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी बँकेमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी आहे. आयडीबीआय बँकेमध्ये तब्बल १५४४ जागांसाठी मेगाभरतीची प्रक्रिया सुरु झाली असून कोणत्या पदासाठी किती भरती केली जाणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तरीखी काय आहे सविस्तर पाहण्यासाठी संपूर्ण खाली दिलेली आहे.

IDBI बँकेने विविध शहरांमध्ये असलेल्या त्यांच्या शाखांमध्ये कार्यकारी आणि सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून १०४४ कार्यकारी पदासाठी आणि ५०० पदांसाठी सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड A च्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. कंत्राटी पद्धतीने पद्धतीने हि भरती केली जाणार आहे.

एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेमधून पदवी उत्तीर्ण केलाला असावा. उमेदवाराचा वय हे १ एप्रिल २०२२ रोजी २० वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी उमेदवारांचे वय हे २१ वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांचापेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी भरतीची जाहिरात पहावी. या भरतीसाठी पत्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.

कार्यकारी किंवा सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइ www.idbibank.in वर असलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करावे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया हि ३ जून २०२२ पासून सुरु होणार असून १७ जून २०२२ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.

पात्र उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तथापि SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फक्त २०० रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे. कार्यकारी पदांसाठी एक वर्षाच्या करारावर भरती केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवरील जाहिरात पहावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने