.


नऊ महिने आपल्या गर्भामध्ये आपल्या बाळाला वाढवल्यानंतर प्रत्येक पालक त्याला पाहण्यासाठी खूप आतुर असतो. बाळाचा चेहरा पाहताच सर्व वेदना पळून जातात. परंतु हा क्षण प्रसिद्ध गायक बी प्राकच्या पत्नीला अनुभवता आला नाही.

बी प्राक आणि त्याची पत्नी मीरा बच्चन यांच्यावर काही दिवसांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला होता. बी प्राक आणि त्याची पत्नी मीराने त्यांच्या नवजात बाळाला गमावले होते. नुकतेच मीराने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक भावूक पोस्ट शेयर करत आपले दु:ख व्यक्त अकेले आहे.

बी प्राकच्या पत्नीने एप्रिल महिन्यामध्ये दुसऱ्यांदा गरोदर असल्याचे जाहीर केले होते. लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करून हि आनंदाची बातमी शेयर केली होती.

पोस्ट शेयर करताना मीराने लिहिले होते कि स्वर्गामध्ये एक खास देवदूत आहे जो माझाच एक भाग आहे. तो तिथे राहवा असे मला मुळीच वाटले नाही. हि देवाचीच इच्छा होती. एकाद्या शूटिंग स्टारप्रमाणे तो इथे आला आणि क्षणार्धात आला आम्हाला सोडून तो स्वर्गात गेला. एखाद्या देवदूतासारखे त्याने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केले आहे. जरी तू माझ्यासोबत नसलास तरी मी कधीच तुझ्यावर प्रेम करणे सोडून देणार नाही. प्रत्येक क्षणी मी तुझाच विचार करत आहे.

तुझं इवलस हृदय इतके महिने धडधडत होत ते आता शांत आहे. तुझ्या हातापायाच्या हालचाली आता थांबल्या आहेत. तुला मोठं होताना, तुला घट्ट धरून ठेवतानाचं स्वप्न आम्ही पाहिलं होतं. तुझी आई तुझ्यावर शेवटपर्यंत प्रेम करेल आणि सत्य हेच आहे की तू होतास, तू आहेस आणि नेहमीच माझासोबत राहशील.


मीराच्या या पोस्टवर कमेंट करताना अनेकांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत. मीरा आणि बी प्राकने ४ एप्रिल २०१९ रोजी लग्न केले होते. तर २०२० मध्ये त्यांना एक मुलगा झाला होता. बी प्राकचे खरे नाव हे प्रतिक बच्चन आहे. त्याने अनेक हिंदी आणि पंजाबी गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने