प्रसिद्ध गायक बी प्राक आणि त्याच्या पत्नीने आई होण्याची बातमी काही दिवसांपूर्वी दिली असल्याची माहिती समोर आली होती. गायक बी प्राकने आपल्या पत्नीचे काही फोटो देखील आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले होते.

परंतु या दरम्यान आता एक दु:खद बातमी समोर आली आहे. गायक बी प्राकने आपल्या नवजात बाळाचे निधन झाल्याची बातमी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट शेयर केली आहे. जन्माच्या काही वेळामध्ये त्या नवजात बाळाने या जगाचा निरोप घेतला.

.

अतिशय भावुक होत गायक बी प्राकने आमच्या दुसऱ्या बाळाचे निधन झाले आहे असे सांगितले. आई-वडील म्हणून हा आमच्या आयुष्यामधील सर्वात दुखद क्षण आहे असे देखील तो म्हणाला. मी त्या सर्व डॉक्टर आणि सहकाऱ्यांचे आभार मानतो ज्यांनी बाळाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला.

.


आम्हाला सर्वांचा सहानुभूतीची गरज आहे. तुमचा लाडका बी प्राक आणि मीरा, अशी पोस्ट त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केली होती. बी प्राकच्या पत्नीचे नाव मीरा आहे. दोघांनी आम्ही पुन्हा एकदा आईवडील बनणार असल्याचे एप्रिल महिन्यामध्ये सर्वांसोबत शेयर केले होते. ४ एप्रिल २०१९ मध्ये दोघांनी लग्न केले होते त्यांना एक मुलगा देखील आहे ज्याचे नाव अदब आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने