गेल्या 5 वर्षापासून रिलेशनमध्ये असणाऱ्या अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूरचे नाते सर्वांनाच माहिती आहे. या दोघांच्या नात्याच्या चर्चा नेहमी रंगलेल्या असतात. विविधी कार्यक्रमांमध्ये ते सुट्टीसाठी निवांत ठिकाणी जाण्यापर्यंत ते नेहमी एकमेकांच्या सोबत असतात.

काही महिन्यांपूर्वी हि जोडी सुट्ट्या घालवण्यासाठी मालदीवला गेली होती. यादरम्यान त्यांनी आपला निवांत वेळ एकमेकांसोबत घालवला होता. यादरम्यान घालवलेल्या खासगी क्षणांचे काही फोटो अर्जुनने शेयर केले होते.

कधी मलायका सायकलिंग करताना पाहायला मिळाली तर कधी तिचा ग्लॅमरस आणि तितकाच घायाळ करणारा बोल्ड लूक पाहायला मिळाला. बीच वेयरमधील तिचा हॉट लुक पाहून चाहत्यांचा कलेजा खल्लास झाला.

पन्नाशीमध्ये देखील मलायका आपल्या वयाची तमा बाळगत नसल्याचे पाहायला मिळाले. तिचे सौंदर्य पंचवीशीतील तरुणीला लाजवेल असेच आहे. दरम्यान अर्जुनने तिचे हे फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेयर केले आहे.

हे फोटो पाहिल्यानंतर ते नेटकऱ्यांना आवडले नाहीत. त्यांनी अर्जुनला थेट खडे बोल सुनवायला सुरुवात केली. नेटकरी म्हणाले, अरे तुझी होणारी पत्नी आहे कि जरा तरी भान ठेव. यादरम्यान अर्जुनने शेयर केलेल्या बोल्ड फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या. अर्जुनने मात्र या प्रतिक्रियांकडे फारसे लक्ष दिले नाही आणि आपल्या प्रेयसीच्या सौंदर्याचे वेगळ्याचे मार्गाने प्रशंसा करणे सुरु ठेवले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने