बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर अभिनेता बॉबी देओलने आपला मोर्चा वेबसिरीजकडे वळवला आहे. बॉबी देओल अनेक दिवस बॉलीवूडपासून दूर होता आणि त्याने दणक्यात पुनरागमन देखील केले होते. पण तो सध्या त्याच्या आश्रम या वेबसिरीजमुळे खूप चर्चेमध्ये आहे.

बॉबी देओलची अभिनय कारकिर्द पुन्हा रुळावर आलेली दिसत आहे. नुतेच या वेबसिरीजचा तिसरा सिझन आला आहे, ज्याने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. तिसऱ्या सिझनमध्ये दर्शकांना भरपूर मसाला पाहायला मिळत आहे आणि दर्शकांना देखील तो खूप आवडत आहे.

दोन सिझनच्या सफलतेनंतर निर्मात्याने तिसरा सिझन दणक्यात प्रदर्शित केला होता. या भागामध्ये अभिनेत्री अनुरिता झाने देखील अनेक बो’ल्ड सीन दिले आहेत. नुकतेच तिला मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला होता कि तिच्या या बो’ल्ड सीनमुळे तिच्या कुटुंबावर काय परिणाम झाला.

यावर उत्तर देताना अभिनेत्री अनुरिता म्हणाली माझे सर्व कुटुंबीय माझे खूप कौतुक करत आहेत. आश्रम ३ प्रदर्शित होण्यापूर्वी अनुरिताला एका मुलाखती दरम्यान विचारण्यात आले होते कि आश्रम ३ मध्ये बो’ल्ड सीन देण्यासाठी कुटुंबातील लोकांनी परवानगी दिली होती का?

यावर उत्तर देताना अनुरिता म्हणाली कि सर्वात आधी मी माझ्या वडिलांना फोन केला होता आणि त्यांना म्हणाले कि मला आश्रम ३ मध्ये अशी भूमिका मिळाली आहे ती मी करू का नाही. यावर माझे वडील म्हणाले कि हो नक्कीच बिनधास्त कर.

जेव्हा वडिलांनी मला असे म्हंटले तेव्हा मला खूपच छान वाटले होते कारण जेव्हा मला माझ्या वडिलांनी परवानगी मिळते तेव्हा मला कशाचीची भीती राहत नाही. यानंतर मी आश्रम वेबसिरीजमध्ये मोठ्या प्रमाणत बो’ल्ड सीन दिले. याचबरोबर अनुरिताने निर्माते प्रकाश झाले देखल यादरम्यान खूप कौतुक केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने