अभिनेत्री अंकिता लोखंडे लग्नानंतर कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेमध्ये राहिली आहे. नुकतेच अंकिता आणि तिचा पती विकीने स्मार्ट जोडीचा किताब आपल्या नावावर केला आहे. या आनंदामध्ये भरीस भर म्हणून या स्टार कपलने आपल्या चाहत्यांना अजून एक आनंदाची बातमी दिली आहे.

विकी जैन आणि अंकिता लोखंडे त्यांच्या नवीन घरामध्ये शिफ्ट झाले आहेत. या कपलने नेत्रदीपक शैलीमध्ये प्रवेश करत फोटो शेयर केला आहे. विकी आणि अंकिताने त्यांच्या नवीन घरामध्ये गृहप्रवेशाची पूजा केली. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

लग्नाच्या ६ महिन्यानंतर अखेर ते आपल्या नवीन घरामध्ये शिफ्ट झाले. अंकिताने १० जून २०२२ रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये तिचा पती विकी जैन तिच्यासोबत दिसत आहे. फोटो शेयर करताना अंकिताने "नवीन सुरुवातीच्या शूभेच्छा बेबी #newhome" असे कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.


या फोटोमध्ये विकी आणि अंकिताच्या घराचे देखणे इंटीरियरही पाहायला मिळत आहे. हे स्पष्ट होते कि विकी आणि अंकिताने आपले घर किती प्रेमाने सजवले आहे. अंकिताने शेयर केलेल्या या पोस्टवर तिचे चाहते देखील तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने