भारत आणि संपूर्ण आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीना पूर्ण जगभरातील लोक ओळखतात. त्यांच्याजवळ जगातील सर्वात महागडे घर आहे. अंबानी कुटुंबाची लाइफस्टाईल नेहमी चर्चेचा विषय ठरलेली असते.

पण तुम्हाला हे माहिती आहे का कि मुकेश अंबानी आपल्या कुकला किती पगार देतात. जर माहिती नसेल तर आज आपण याबदल जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांच्या इतर नोकरांना किती पगार मिळतो हे देखील जाणून घेणार आहोत.

मुकेश अंबानीचे घर अँटिलियामध्ये जवळ जवळ ६०० नोकर काम करतात आणि आणि आपल्या स्टाफला अंबानी परिवार आपल्या कुटुंबाप्रमाणे मानते. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि मुकेश अंबानीच्या घरामध्ये काम करणाऱ्या नोकरांची दोन मुले अमेरिकेमध्ये शिक्षण घेत आहेत.

माहितीनुसार अँटिलियामध्ये काम करण्याऱ्या कोणत्याही स्टाफचा पगार हा २ लाख रुपये पेक्षा कमी नाही. म्हणजे मुकेश अंबानी फक्त आपल्या कुकलाच प्रत्येक महिन्याला २ लाख रुपये पगार देतात. तसे तर हैराणीची गोष्ट हि पण आहे कि,

मुकेश अंबानीच्या स्टाफच्या पगारामध्ये एजुकेशन अलाउंस आणि जीवन बीमा देखील सामील केला जातो. जर तुम्हाला वाटत असेल कि २ लाख पगारामध्ये कुक जगभरामधील खास डिशेस बनवतो पण हे चुकीचे आहे.

कारण मुकेश अंबानी यांना असल्या डिशेस आवडत नाहीत त्यांना साधे जेवणच आवडते. मुकेश अंबानी यांच्या जेवणामध्ये जास्त करून गुजराती डिश बनवली जाते. तसे तर मुकेश अंबानी यांची फेवरेट डिश इंडली सांबर आहे.

माहितीनुसार मुकेश अंबानी स्वतः देखील जेवण बनवतात. अंबानी कुटुंबामध्ये सर्वात चांगले जेवण त्यांची मुलगी बनवते. पण अंबानी कुटुंबाचा नोकर होणे देखील साधी गोष्ट नाही. यासाठी एक विशेष परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये पास झालेल्या लोकांनाच अंबानी कुटुंबामध्ये नोकरी मिळते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने