बॉलीवूडमध्ये तसे तर नेहमी नवीन लव स्टोरी आणि ब्रेकअपच्या स्टोरी पाहायला आणि ऐकायला मिळतात. पण यामध्ये ऐश्वर्या राय आणि सलमान खानची लव्ह स्टोरी आणि ब्रेकअप सर्वांना चांगलेच माहिती आहे. दोघांची लव स्टोरी १९९९ मध्ये हम दिल दे चुके सनम चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सुरु झाली होती.

तेव्हा सलमान खान ९० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेता बनला होता. तर ऐश्वर्या आपल्या करियरच्या शिखरावर होती. ऐश्वर्या आणि सलमानने एकमेकांना जवळजवळ दोन वर्षे एकमेकांना डेट केले. २००२ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपमधील काही गोष्टी तेव्हा समोर आल्या होत्या.

सलमान खानने ऐश्वर्याकडून दोन वर्षे रिलेशनशिपनंतर एक वचन मागितले होते. पण ऐश्वर्या हे वचन पूर्ण करू शकली नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले. सलमान इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले काम करत होता. यामुळे तो लग्न करून सेटल होणार होता. त्याने ऐश्वर्याकडून लग्नाचे वचन मागितले होते. तथापि ऐश्वर्याने लग्नास नकार दिला कारण तिला आपल्या करियरवर फोकस करायचे होते.

ऐश्वर्याने वचन तोडल्यानंतर सलमान खूपच भडकला होता. तो ऐश्वर्याला फिजिकली आणि इमोशनली खूप टॉर्चर करत असे. ऐश्वर्याने स्वतः देखील ब्रेकअप नंतर सलमानवर आरोप लावले होते. सलमान प्रेमात इतका अंधळा झाला होता कि तो ऐश्वर्यावर शंका देखील घेऊ लागला होता.

एक दिवस तो ऐश्वर्याच्या घरी मध्यरात्री पोहोचला होता. दोन तास तो ऐश्वर्याच्या घराचा दरवाजा वाजवत होता आणि ऐश्वर्याला ध म की दिली कि दरवाजा उघडला नाही तर तो बिल्डींगवरून खाली उडी मारेल. नंतर रात्री ३ वाजता ऐश्वर्याने दरवाजा उघडला. तथापि यानंतर ऐश्वर्या समजून गेली होती कि सलमान तिच्यासाठी योग्य नाही. यामुळे तिने सलमानपासून दूर जाण्यास सुरुवात केली.

इतकेच नाही तर ऐश्वर्याने सलमानला सोडून विवेक ओबेरॉयला डेट करण्यास सुरुवात केली होती तेव्हा सलमान खानने त्याला ध म की देखील दिली होती. यामुळे शेवटी ऐश्वर्याने सलमानला कंटाळून त्याच्याशी ब्रेकअप केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने