भारतामध्ये टॅलेंटची कमी नाही हे सांगणे वावगे ठरणार नाही. कारण भारतामध्ये असे टॅलेंटेड लोक आहेत ज्यांनी आपले टॅलेंट आपल्यामध्ये लपवून ठेवले आहे. असे लोक आहेत ज्यांना आजपर्यंत टॅलेंटसाठी चांगली ओळख मिळाली नाही आणि हेच कारण आहे कि असे लोक खूप मागे राहतात.

एक गोष्ट तर बरोबर आहे कि जेव्हापासून सोशल मिडियाचा जमाना आला आहे तेव्हा पासून लोकांना आपले टॅलेंट दाखवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म भेटले आहे. यावर लोकांनी आपले टॅलेंट देखील दाखवायला सुरु केले. त्यामुळे अशा लोकांना खूप प्रसिद्धी मिळाली.

आज आपण अशा एका आजीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील चकित व्हाल. सोशल मिडियावर एका आजीच्या गाण्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तसे तर आज लता मंगेशकर आपल्यामध्ये नाहीत.

पण त्यांची गाणी आणि त्यांचा आवाज आज देखील आपल्यामध्ये आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आजीने गायलेल्या गाण्याला सोशल मिडियावर चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत असलेली आजी लता मंगेशकर यांचे मिलो ना तुम तो दिल घबराए हमें क्या हो गया है… हे गाणे म्हणत आहे.

आजीच्या सोबत एक व्यक्ती आहे जो ढोलक वाजवत आहे आणि आजी हारमोनियम वाजवत गाणे म्हणत आहे. आजीचा आवाज इतका मधुर आहे कि तुम्ही बॉलीवूडमधील गायकांना देखील विसरून जाल. आजीने गाणे म्हंटलेला हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ @Mahanaatma1 टि्वटर अकाउंट वरून शेयर केला गेला आहे. पोस्ट करताच हा व्हिडीओ पाच हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओच्या कमेंटमध्ये लोक आजीने गायलेल्या या गाण्याचे खूप कौतुक करत आहेत.

पहा व्हिडीओ-:

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने