प्रत्येकाला नाचता येतं अस नाही पण नाचण्याची आवड प्रत्येकाला असते. त्यामुळे लग्न असो किंवा इतर कोणता दुसरा कार्यक्रम अशामध्ये आपल्यांना नागीण डांस हा पाहायला मिळतोच. नागीण गाणे लागले कि लोक आपसूकच नागीणसारखे डोलू लागतात.

एक गारुडी बनतो तर दुसरा नाग आणि मग दोघांमध्ये सुरु होतो नागीण डांस. नागीण डांसचे असे बरेच व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होतात. अशामध्ये एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावरून नजर देखील हटणार नाही आणि हसू देखील आवरणार नाही.

तुम्ही नागीण डांसचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण असा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदाच पाहाल. नागीण डांसमध्ये जसे एक गारुडी आणि एक नागीण अस दोघेजण असतात तेसेच या व्हिडीओ मध्ये चक्क एक आजी नागीण झाली आहे आणि गारुडी तिचा नातू झाला आहे.

पुंगीचा आवाज ऐकू येताच आजीबाईने नागिणीचा अवतार घेतला आणि तालावर ती नागिणीसारखे नाचू लागली आणि आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या आपल्या गारुडी नातवालाच डसली. व्हिडीओमध्ये नागीण गाण्याची धून ऐकू येत आहे आणि एक तरुण आणि त्याच्यासोबत काही महिला नाचताना दिसतात.

त्यानंतर हा तरुण आपल्या आजीला घेऊन येतो आणि तिथे नाचणारे सर्वजण बाजूला होतात. आजी आणि नातू समोरासमोर उभे राहतात आणि नातू आपल्या जवळच्या रुमालाचे एक टोक तोंडात धरतो आणि दुसरे टोक हातामध्ये धरतो आणि रुमालाची पुंगी करून तो गाण्याच्या तालावर फिरवतो.

आजी सुरुवातीला शांत उभी राहते पण नंतर ती नागीणच्या तालावर थिरकू लागते. नातू गारुडी होऊन थिरकू लागतो तसेच आजी देखील नागिणीचा अवतार घेते आणि डोलू लागते. तिच्या चेहऱ्या वरचे हावभाव देखील बघण्यासारखे आहेत.

पहा व्हिडीओ:-

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने