महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून ओळखले जाणारे अभिनेते आदेश बांदेकर सध्या महा मिनिस्टर या शोमध्ये खूपच चर्चेमध्ये आले आहेत. सध्या ते या कार्यक्रमाद्वारे अकरा लाखाच्या पैठिणीच्या मानकरी माऊलीच्या शोधामध्ये महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर आहेत. येत्या रविवारी या शोचा अंतिम भाग पाहायला मिळणार आहे.

होम मिनिस्टर या महिलांच्या तुफान लोकप्रिय कार्यक्रमामुळे अभिनेते आदेश बांदेकर घराघरामध्ये ओळखले जातात. गेल्या १८ वर्षांपासून ते या शोचे यशस्वी सूत्रसंचालन करत आहेत. नुकतेच त्यांनी आपल्या प्रवासादरम्यानचा एक किस्सा शेयर केला आहे.

आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर शोचे सिन्नरमध्ये शुटींग सुरु होते. यादरम्यान ते शुटींग संपवून परत येत होते. दरम्यान जोरदार पाऊस सुरु झाला. सिन्नरमधील एका दगडी मंदिरामध्ये ते दर्शनासाठी खाली उतरले. दर्शन घेऊन झाल्यानंतर ते परत निघण्यासाठी गाडीमध्ये बसले.

तेव्हा एक गाय त्यांच्या गाडीच्या समोर येऊन उभी राहिली. हॉर्न दिला तरी ती गाय काही हटली नाही. बराच वेळ झाल्यानंतर ती समोरून बाजूला झाली. त्यानंतर त्यांनी गंमतीने म्हंटले कि चला आता सिग्नल मिळाला आहे. तेव्हा पुढे पाऊस खूपच वाढला.

आमची गाडी हळू हळू जात होती तेव्हा समोरून एक रुद्ध आजोबा इशारे करत आमच्या गाडीच्या समोर आले. आम्ही गाडी थांवली असता ते म्हणाले पुढच्या नदीवरचा पूल पाण्याने ढासळला आहे दुसऱ्या मार्गाने जावा. नशीब बलवत्तर होतं त्यामुळे एका गायीने आमचा जीव वाचवला...’

या व्हिडीओ आतापर्यंत लाईक आणि कमेंटचा वर्ष झाला आहेत. लोकांनी कमेंट करून म्हंटले आहे कि देव तुमच्या पाठीशी आहे. काहींनी म्हंटले आहे कि देव तारी त्याला कोण मारी. तुमची पुण्याई आणि देवाच्या आशीर्वादाने तुम्ही वाचलात.

पहा व्हिडीओ:-


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने