.

राजस्थानच्या हनुमानगढ़ जिल्ह्यामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. इथे एक महिला चक्क १० दिवसांमध्येच आपला नवरा बदलते. खास गोष्ट हि आहे कि ती फक्त अविवाहित आणि तरुण मुलांसोबत लग्न करते. तिने एक ग्रुपच बनवला आहे जे तिचे खोटे नातेवाईक बनून तिचे लग्न लावून देतात.


हनुमानगढ़ मधील नेठराना गावामधील नेकीरामचे लग्न होत नव्हते. त्याने गावामधील कमलेश जाटला आपली हि समस्या सांगितली. कमलेशने मु स्ली म समाजामधील आपल्याच एका धर्मामधील बहिणीशी त्याचे लग्न लावून देण्याचे बोलले.

कमलेशने त्याची शबनम पुत्री नवाब खांसोबत भेट घालून दिली. त्याने शबनमला हनुमानगढ़ टाउनच्या पारीक कॉलोनीमधील रहिवाशी असल्याचे सांगितले. नंतर कोर्ट कचेरीचा खर्च सांगून त्याच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपये घेऊन त्याचे लग्न देखील लावून दिले. दोघांचे लग्न १३ मे २०२२ मध्ये भादरा कोर्टमध्ये झाले. ज्याची ५०० रुपयेच्या स्टँपपेपरवर लिखापढी देखील झाली.

लग्नानंतर नेकीराम आणि शबनम नेठारानाला आले. जवळ जवळ ६ दिवस ती त्याच्या घरी राहिली. यानंतर कमलेश गाडी घेऊन आला आणि एका दिवसासाठी शबनमला घेऊन गेला. नेकीरामला सांगितले गेले कि शबनमला त्याच्याजवळ सकाळी सोडण्यात येईल.

पण ती कधीच आली नाही. पो लि सांच्या चौकशीमध्ये असे समजले कि शबनमने नेकीरामसोबत लग्न केल्यानंतर २३ मे रोजी खचवानाचे धर्मपालचा पुत्र महावीर जाटसोबत दुसरे लग्न केले. इथे देखील स्टँपपेपरवर लिखापढी करण्यात आली आणि यासाठी दोन लाख चोवीस हजार रुपये घेतले गेले.


यानंतर १० दिवसांनंतर महिलेने कैथलमधील एका युवकासोबत लग्न केले. धर्मपालने पो लि सांत तक्रार केली आहे. त्याने आरोप लावला आहे कि शबनम आणि कमलेशने मिळून त्यांच्याकडून लग्नाच्या नावावर लाखो रुपये फसवून घेतले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने