वृषभ लग्न असणारे लोक आपले नशीब स्वतः चमकवतात. हे लोक खूप चांगले सल्लागार असतात. ते पूर्ण इमानदारीने सल्ला देतात आणि कधी कोणाला ओळखण्यामध्ये धोका खात नाहीत. यांचे सुरुवातीचे जीवन भलेहि संघर्षपूर्ण किंतु मध्य आणि अंत नेहमी सुखमय असतो.

हे लोक धार्मिक सहिष्णुतेने परिपूर्ण असतातच शिवाय दुखाच्या वेळी आपली सहनशीलता गमवत नाहीत. तथापि यांना जीवनामध्ये खूप कष्ट करावे लागतात. आज आपण वृषभ लग्न असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत.

वृषभ, काल पुरुषच्या कुंडलीमधील दुसरी राशी असते. या राशीचा सिम्बॉल बैल आहे. बैल अर्थात वृश शेतीशी जोडला गेलेला आहे. बैल हा नांगरणीचे काम करतो. याचा अध्यात्मिक पैलू हा देखील आहे कि हा शंकराच्या परिवारातील एक सदस्य आहे.

हा कृतिका नक्षत्राच्या तीन चरण, रोहिणीचे चार चरण, मृगशिराचे दोन चरण यांनी मिळून बनलेला आहे. याची गणना सौम्य राशीमध्ये होते. हि राशी दक्षिण दिशेची राशी आहे. स्थिर स्वभाव असणारी हि स्त्री जातीची राशी आहे.

मेषप्रमाणे याचा देखील पाठीमागून उदय होतो यामुळे याला पृष्ठोदय राशि देखील म्हणतात. या राशीमध्ये चंद्र उच्च स्थानी असतो. ४ ते ३० अंशापर्यंत चंद्र मूळ त्रिकोणमध्ये असतो. वृषभ लग्नाच्या लोकांचे डोळे खूपच सुंदर असतात.

हे लोक समोरच्याच्या चरित्राबद्दल आणि स्वभावाबदल लगेच जाणून घेतात. यामुळे जर वृषभ लग्न असलेल्या लोकांना सल्लागार बनवले तर ते खूपच लाभदायक ठरू शकते. हे लोक खूपच इमानदार असतात. यांच्या व्यक्तित्वामध्ये चुंबकीय आकर्षण असते.

वृषभ लग्न असलेल्या लोकांना देवस्थान फिरायला खूप आवडते. हे लग्न एक मात्र असे लग्न आहे जे इतर लग्नांच्या तुलनेने जास्त मेहनती असते. वृषभ लग्नाचे लोक स्पष्ट बोलणारे असतात आणि कुटुंबांसोबत राहणारे असतात. या लोकांमध्ये स्नेहभावना अधिक असते.

वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये शनी खूपच चांगले परिणाम देतो कारण शनी शुक्राचा परम मित्र आहे. शनी कर्म आणि लाभाचा स्वामी आहे. बुध देखील हे लग्न असणाऱ्या लोकांना शुभ फळ देतो. वृषभ लग्न असणाऱ्या लोकांच्या कुंडलीमध्ये जर बुध चांगला असेल तर असे जातक खूपच बुद्धिमान असतात.

या लग्नाच्या लोकांना सुख प्राप्तीसाठी सूर्यदेवाची आराधना करायला हवी. चौथा भाव अर्थात सुखाच्या घरामध्ये सिंह राशी येते आणि सिंहचा स्वामी सूर्य आहे यामुळे घराच्या सुख शांतीसाठी सूर्यदेवाला प्रसन्न केले पाहिजे.

व्यक्तीला पूर्व जन्माच्या आधारावर लग्न मिळते. या लग्नाच्या जातकांनी हे लक्षात ठेवावे कि कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये भाग्य भावाची राशी अष्टम पडते. अष्टमचा अर्थ होतो जमिनीच्या खाली दबलेली वस्तू. याचा अर्थ असा होतो कि काही मिळवण्यासाठी जमीन खोदावी लागले किंवा मेहनत करावी लागते. यामुळे तुम्हाला वृषभ प्राप्ती झाली आहे. जेणेकरून जमिनीच्या खालून आपले भाग्य फलीभूत करता यावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने