विनायक दामोदर सावरकरांची आज १३९ वी जयंती आहे. याप्रसंगी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती संदीप पंडित करणार आहेत तर महेश मांजरेकर दिग्दर्शन करणार आहेत. नुकतेच या चित्रपटामधील सावरकरांच्या भुमिकेअचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंद्त्व धर्म नही, इतिहास है असे या चित्रपटाचे नाव आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या चित्रपटाचे शुटींग सुरु करणात येणार आहे.

जेव्हा हर्षद मेहता, विजय माल्ल्या आणि ललित मोदी यांचे चित्रपट ट्रेंड मध्ये असतात तर मला वीर सावरकरांची जीवनगाथा सांगण्यास जास्त रस वाटला. ते भारताचे पहिले डायनॅमिक हिरो होते. एक चित्रपट म्हणून नाही तर सावरकरांनी केलेल्या संघर्षाची वस्तुस्थिती जगाला दाखवून द्यायची आहे.

त्यांनी इंग्रजांसोबत दिलेला धाडसी लढा, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची हिंदुत्वासाठी असलेली बांधिलकी खूपच प्रेरणादायी आहे. चित्रपटामध्ये रणदीप हुडा वीर सावरकरांची भूमिका साकारणार आहे. असे निर्माते यावेळी म्हणाले.

रणदीपने एक अभिनेता म्हणून आपले कौशल्य नेहमी दाखवले आहे आणि त्याने साकारलेल्या भूमिका तो मनापासून साकारतो. विशेष म्हणजे सावरकरांच्या बाबतीत स्वातंत्र्यसैनिकांसोबत त्याच्या विलक्षण साम्यामुळे आणखी एक उमेद मिळाली.

दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात. एक चित्रपट निर्माता म्हणून मी सावरकरांच्या विचारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चित्रपटामधील सावरकरांच्या व्यक्तिरेखेवर याचा परिणाम होणार नाही.

अभिनेता रणदीप हुडा यावर बोलताना म्हणाला कि, भारताच्या स्वातंत्र्य आणि आत्म-वास्तविकतेच्या लढ्यातील सर्वात उंच नायकांपैकी एकाला हा सलाम आहे. मला अशा आहे कि खऱ्या क्रांतिकारकाने दिलेल्या योगदानाचे आव्हान मी पेलू शकेन.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने