हिंदू धर्मामध्ये तुळशीचे झाड खूप पवित्र मानले जाते. तुळशीला विष्णू प्रिया असे देखील म्हंटले जाते. श्रीहरीच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. तुळशीशिवाय श्रीविष्णूची पूजा पूर्णच होत नाही.

तुळशीचे रोप घरामध्ये लावल्याने सुख-समृद्धी येते. तुळशीचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. धार्मिक मन्यतेनुसार नियमित रूपाने तुळशीची पूजा केल्याने जीवनामध्ये सुख-शांती बनून राहते. तर तुळशीचे काही उपाय केल्याने अनेक समस्या दूर देखील होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया तुळशीचे चमत्कारिक उपाय.

या मंत्राने तुळशीला जल अर्पण करा: जर घरामध्ये मतभेद, रोग किंवा आर्थिक तंगीचा सामना करावा लागत असेल तर तुळशीला नियमित रूपाने जल अर्पण करावे. जल अर्पण करते वेळी (महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते) या मंत्राचा जाप करावा.

इच्छा पूर्ण करण्यासाठी: आपली इच्छा मनामध्ये धरून एक पिवळा धागा घ्या. हा धागा आपल्या उंची इतका असावा. हा धागा तुळशी जवळ न्या आणि आपली मनोकामना बोला. त्याचबरोबर पिवळ्या धाग्याला १०८ वेळा गाठ मारा. नंतर हा धागा तुळशीच्या झाडाला बांधा. जेव्हा तुमची मनोकामना पूर्ण होईल तेव्हा हा धागा काढून पाण्यामध्ये सोडून द्या.

घरातील नकारात्मकता दूर होईल: तुळस विष्णुदेवाला खूप प्रिय आहे. यामुळे विष्णुदेवाच्या पूजेला तुळशीचा वापर केला जातो. हा उपाय केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. फक्त झोपण्यापूर्वी आपल्या उशीखाली पाच तुळशीची पाने ठेवून झोपावे. यामुळे घरामधील सर्व नकारात्मकता दूर होईल.

पैशाची कमतरता भासणार नाही: सकाळच्या वेळी तुळशीची ४ पाने तोडा. हि पाने पितळेच्या पाण्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये भिजत ठेवा. २४ तास पाण्यामध्ये ठेवल्यानंतर हे पाणी पूर्ण घरामध्ये शिंपडा. लक्षात ठेवा कि घराच्या मुख्य दरवाजावर जरूर शिंपडावे. हा उपाय केल्याने आपले भाग्य उजळेल. घरामध्ये कधीच पैशांची उणीव भासणार नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने