रात्रीस खेळ चाले मालिकेमधील शेवंताने तरुणांना चांगले वेड लावले होते. शेवंताची भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने केली होती. या मालिकेमधूनच अपूर्वाला मोठी लोकप्रियता मिळाली. अपूर्वा रातोरात स्टार झाली.

आज अपूर्वाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे आणि अपूर्वा आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहण्यासाठी तिच्यासंबंधी काहीना काही अपडेट नेटकऱ्यांना देत असते. आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधी जाणून घेण्यासाठी देखील लोक नेहमी उत्सुक असतात.

यादरम्यान अपूर्वाने सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. अपूर्वाने आपल्या चाहत्यांसोबत एक खूप महत्वाची गोष्ट देखील शेयर केली. चाहत्यांशी संवाद साधताना अपूर्वाने आपल्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा केला.

चाहत्यांशी संवाद साधताना एका चाहत्याने अपूर्वाला तिच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारला कि तू सिंगल आहेस कि तुझे लग्न झाले आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना अपूर्वा म्हणाली कि, मी अजून सिंगलच आहे आणि माझ्या सोलमेटची वाट पाहत आहे.

अपूर्वा मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अपूर्वाने इतर अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकांमध्ये देखील ती अभिनय करताना पाहायला मिळाली. अपूर्वाला रात्रीस खेळ चाले २ या मालिकेमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. मालिकेबरोबरच अपूर्वाने इश्क वा लव्ह चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने