साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात पॉपुलर अभिनेत्रींपैकी एक म्हणून समांथा रुथ प्रभूला ओळखले जाते. अभिनेत्री आपल्या चित्रपटांसोबतच आपल्या जबरदस्त लुक आणि फिटनेसमुळे देखील खूपच चर्चेमध्ये राहत असते.

सोशल मिडियावर देखील तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे. तथापि इतर सेलेब्रिटीप्रमाणे समांथाला देखील अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण समांथा अशा हस्तींपैकी आहे जी त्यावर सडेतोड उत्तर देऊन बोलती बंद करते.

नुकतेच समांथाला पुन्हा एकता ट्रोलिंगचा सामना करावा करावा लागला. एका ट्विटर युजरने समांथाला ट्रोल करताना तिच्यावर घाणेरडी कमेंट केली. ज्यानंतर अभिनेत्री समांथाने त्यावर प्रतिक्रिया देत त्या युजरची बोलतीच बंद केली.

वास्तविक ट्विटर यूजरने समांथाच्या ट्विट वर कमेंट करताना म्हंटले कि तू तुझ्या कुत्र्या आणि मांजरासोबतच एकटीच मरशील. यावर अभिनेत्रीने लगेच प्रतिउत्तर दिले आणि लिहिले कि मी यासाठी स्वताला खूपच भाग्यशाली समजेन. समांथाने असे उत्तर देताच ट्रोलरने आपले ट्विट डिलीट करून टाकले.

तथापि यादरम्यान समांथाच्या एका चाहत्याने याचा स्क्रीनशॉट घेतला. त्यानंतर त्याने हा स्क्रीनशॉट शेयर करताना लिहिले कि, त्याने ट्वीट डिलीट केले आणि तो पळून गेला. आता समांथाचे चाहते तिचे खूपच कौतुक करत आहेत.


एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले कि त्याने तुमचा अपमान करण्यासाठी असे लिहिले होते, पण यावर संयम राखत अभिनेत्रीने त्याला पॉजिटिव रिप्लाई दिला. याशिवाय देखील अनेक चाहत्यांनी कमेंट करताना अभिनेत्रीचे चांगलेच कौतुक केले.

अभिनेत्री समांथा लवकर चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच तिने आपल्या बहुप्रतीक्षित कुशी चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले आहे. ज्यामध्ये ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत पाहायला मिळणार आहे. याशिवाय तिचे यशोदा आणि शकुंतलम चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने