Prajkta Mali

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्वी पंडित अभिनित रानबाजार या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये प्राजक्ता माळीचा बोल्ड लुक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

वेब विश्वामध्ये एकच खळबळ माजवणाऱ्या या वेबसिरीजच्या टीझर मधील प्राजक्ता माळीचा बो’ल्ड सीन पाहून तिचे चाहते तिला चांगले ट्रोल करू लागले आहेत. मात्र प्राजक्ताने याकडे साफ दुर्लक्ष करत याला सडेतोड उत्तर दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून रानबाजार या वेबसिरीजची चांगली चर्चा पाहायला मिळत आहे. या टिझरमधून अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कधी नव्हे ते बो’ल्ड लुक पाहायला मिळाला. तिच्या या बो’ल्ड सीनमुळे सध्या ती सोशल मिडियावर चांगली ट्रोल झालेली पाहायला मिळत आहे.

दरम्यान एका मुलाखती दरम्यान प्राजक्ताने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली कि प्रत्येक कलाकाराला आपल्या करियरमध्ये विविध भूमिका साकाराव्या लागतात. समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या विविध भूमिका साकारण्यासाठी काहीतरी नवीन करावे लागते.

मी पण त्याला काही अपवाद नाही. लहानपणापासूनच मी स्मिता पाटील, रंजना यांना बघतच मोठी झाली आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेरित होऊनच प्रेक्षकांवर विश्वास ठेऊन हा छोटासा प्रयत्न केला आहे.

या सिरीजमध्ये प्राजक्ता माळी सोबत तेजस्वी पंडीत देखील पाहायला मिळणार आहे. रानबाजार’चा दुसरा टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. रेगे, ठाकरे सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी हि सिरीज दिग्दर्शित केले आहे.

20 मे पासून हि सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रानबाजार या भव्य वेबसिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल या दोन कंपन्यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने