बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यामुळे देखील नेहमी चर्चेमध्ये राहत असते. नुकतेच ती एका मुलीची आई बनली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का कि विराट कोहलीसोबत लग्न करण्यापूर्वी अनुष्का ५ दुसऱ्या पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिली आहे.

जोहेब युसुफ: एक रँप मॉडेल जोहेब युसुफसोबत अनुष्का आपल्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये भेटली होती. दोघे दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. नंतर अनुष्का स्टार बनली आणि त्यांची हि रिलेशनशिप तुटली.

सुरेश रैना: क्रिकेट जगताशी अनुष्का आधीपासूनच जोडली गेली आहे. क्रिकेटर सुरेश रैनासोबत देखील तिच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या. स्वतः सुरेश रैनाने देखील मिडियासमोर अनुष्कासाठी आपले प्रेम व्यक्त केले होते.

रणवीर सिंह: रणवीर सिंहसोबतच अनुष्काने आपल्या बॉलीवूडमधील करियरची सुरुवात केली होती. दोघांनी एकामागून एक सलग तीन जबरदस्त हिट चित्रपट दिले होते. नंतर त्यांचा ब्रेकअप झाले आणि दोघे वेगळे झाले. तथापि आज देखील दोघे खूप चांगले मित्र आहेत.

अर्जुन कपूर: अनुष्का शर्मा आणि अर्जुन कपूरला एकदा कॉफी शॉपमध्ये पाहिले गेले होते. यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. तथापि यावर दोघांनी कोणतेही स्टेटमेंट दिले नाही. काही दिवसांनंतर अनुष्काने विराट कोहलीसोबत लग्न केले.

रणबीर कपूर: रणबीर कपूर आणि अनुष्का शर्माच्या अफेयरच्या चर्चा खूपच रंगल्या होत्या. दोघांना अनेक वेळा एकत्र फिरताना पाहिले गेले होते. ते एकत्र पार्टी देखील करत असत. पण दोघांनी कधीच आपल्या अफेयर संबंधी कोणतेही ऑफिशियल स्टेटमेंट दिले नाही.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने