बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीवर राज्य केले आहे. ज्यांच्या फक्त अस्तित्वानेच चाहत्यांना हायसे वाटते. काही अभिनेत्री तर कित्तेक दशकं फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाचे प्रदर्शन करत आहेत.

आजही आपल्या एक फोटोने अनेकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे मलायका अरोरा. मॉडेलिंगच्या दिवसांपासूनच मलायकाने तिच्या सौंदर्याने चाहत्याने भुरळ पाडली. कमनीय बांधा त्यामध्ये तिचे खुलवणारे सौंदर्य आणि तिची रोखलेली नजर हे शब्दामध्ये देखील मांडणे कठीण आहे.

मलायक अरोरा खान कुटुंबाची सून झाल्यानंतर ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली. पण तिने कमबॅक करत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली. सध्या मलायका अरोरा तिच्या फोटोमुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे.

तिचा फोटो पाहून चाहते देखील चकित झाले आहेत. तसा हा फोटो फारसा जुना नाही पण त्यामध्ये तिचे सौंदर्य इतके कमालीचे कि काय सांगूच नका. यामध्ये मलायकाने सॅटिन मटेरियलचा शर्ट आणि शिमरी ब्लॅक नाईट ड्रेस घातला आहे.


मोकळे केस, साजेशी ज्वेलरी अशा लुकमध्ये मलायकाचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे. वयाच्या पन्नाशीमध्ये आली असून देखील मलायका तिच्या सौंदर्याची चांगलीच काळजी घेत असल्याचे दिसून येते.

मलायकाने अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केले होते. एका जाहिरातीच्या शुटींगदरम्यान त्यांची ओळख झाली होती आणि पुढे याचे रुपांतर प्रेमात झाले. पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याच निर्णय घेतला.

१९९८ मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने दोघेही विवाहबंधनामध्ये अडकले. पण १९ वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर त्यांच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाला.

अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर मलायकाने अर्जुन कपूरला डेट करण्यास सुरुवात केली. अर्जुन आणि मलायका आता त्यांच्या या नात्याला लग्नाच्या बेडीत अडकवणार आहेत. लवकर दोघेही लग्न करणार असल्याने म्हंटले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने