बॉलीवूड अभिनेत्री मंदिरा बेदी आपल्या हटके अभिनयामुळे नेहमी चर्चेमध्ये राहत असते. काही दिवसांपूर्वी तिचा पती राज कौशलच्या निधनामुळे ती पुरती खचून गेली होती. मात्र आता तीने या धक्क्यातून स्वतःला सावरत आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यास सुरुवात केली आहे.

यादरम्यान तिचे काही फोटो सोशल मिडियावर चांगले व्हायरल झाले आहेत. हा फोटो मंदिरा आणि तिच्या एका मित्राचा आहे. या फोटो सोशल मिडियावर टाकल्यानंतर मंदिराला चांगलेच ट्रोल करण्यात येऊ लागले आहे.

नुकतेच मंदिरा तिच्या एका जवळच्या मित्राच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी थायलंडला गेली आहे. यादरम्यान तिचे जवळचे मित्र-मैत्रिणी देखील तिच्यासोबत पाहायला मिळाले. या व्हेकेशन दरम्यानचे काही फोटो मंदिराने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले. पण हे फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

मंदिराने नुकतेच एक फोटो तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केला. या फोटोमध्ये ती आदित्य मोटवानी सोबत पाहायला मिळत आहे. त्यांचा हा फोटो स्विमिंगपूलमधील असून फोटोमध्ये मंदिरा आदित्यच्या खूपच क्लोज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले.


आदी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा फोटो बरेच काही सांगून जातो. तू माझ्यासाठी किती खास आहेस. आपण एकमेकांना कधीपासून ओळखतो, आपल नात काय आहे आणि माझा पूर्णपणे विश्वास आहे. नेहमी तुला यश आणि आनंद मिळत राहो. १७ वर्षे झाली तू माझा जवळचा मित्र आहेस. असे कॅप्शन देत तिने फोटो शेयर केला आहे.

मात्र मंदिराने शेयर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना फारसा आवडला नाही. कोण आहे हा? तुझ्या नवऱ्याचे तर निधन झाले ना. असे एका चाहत्याने तिला विचारले. इतर चाहत्यांनी देखील अशाच कमेंट करण्यास सुरुवात केल्यानंतर मंदिराने कमेंट सेक्शन बंद करून टाकले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने