जगभरामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारा चित्रपट केजीएफ चॅप्टार २ कोणी पाहिला नसेल असे क्वचितच असेल. जर तुम्ही चित्रपट एकदा पाहिला तर तो पुन्हा पहावासा वाटेल. तुम्ही चित्रपटाचे फॅन व्हाल. दरम्यान फिल्मी जगतामधून एक दुखद बातमी समोर आली आहे. वास्तविक या चित्रपटाशी संबंधित अभिनेता मोहन जुनेजाचे आज शनिवारच्या सकाळी निधन झाले आहे.

बेंगलोरच्या हॉस्पिटलमध्ये घेतला अंतिम श्वास: मोहन जुनेजाने आज सकाळी म्हणजेच ७ मे २०२२ रोजी आपल्या आयुष्याची शर्यत हरली. सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेता मोहन एका मोठ्या आजाराने पिडीत होते. ते अनेक दिवसांपासून आजारी होते ७ मेच्या सकाळी त्यांचे बेंगलोरच्या हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

मोहन जुनेजा आपल्या उत्कृष्ट कॉमेडीसाठी ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे. जर तुम्ही केजीएफ चॅप्टार १ पाहिला असेल तर या चित्रपटामध्ये अभिनेताने पत्रकार आनंदीच्या इनफॉर्मरची भूमिका साकारली होती. या चित्रपटा नंतर त्यांना मॉन्स्टर अंकल म्हणून देखील ओळखले जाऊ लागले होते. मोहन जुनेजा साउथ इंडस्ट्री मधील प्रसिद्ध नाव आहे.

तथापि त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. मोहन जुनेजाने १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांनी तमिळ, तेलगु, मल्याळम पासून हिंदी भाषांमध्ये आपल्या अभिनयाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे.

असे होते मोहन जुनेजाचे करियर: साउथ इंडियन अभिनेता मोहन जुनेजाला चेलता चित्रपटामधून मोठा ब्रेक मिळाला होता. या चित्रपटामधील अभिनेत्याचा रोल दर्शकांच्या मनामध्ये आजदेखील ताजा आहे. याशिवाय मोहन जुनेजाने वतारा सारख्या टीव्ही सिरीयलमध्ये देखील काम केले. मोहन जुनेजा केजीएफ चॅप्ट र १ आणि केजीएफ चॅप्टवर २ या सुपरहिट चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळाले. मोहन जुनेजाच्या निधनानंतर सोशल मिडियावर शोक व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने