बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि कॅटरीना कैफ अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये आहेत. लग्नानंतर दोघांचे अनेक फोटो सोशल मिडियावर पाहायला मिळत आहेत. कॅटरीना कैफ आणि विकी कौशल बॉलीवूडमधील असे कपल आहे ज्यांनी आपल्या नात्याला लग्नापर्यंत लपवून ठेवले.

नेहमी दोघे एकत्र पाहायला मिळत होते आणि सर्वजण त्यांना त्यांच्या नात्याबद्दल देखील विचारायचे पण कॅटरीना आणि विकीने त्यांच्या नात्याबद्दल कधीच खुलासा केला नाही. त्यांच्या लग्नाची बातमी आल्यानंतर रिपोर्टर्स देखील त्यांना स्पॉट करत असत आणि त्यांच्या लग्नासंबंधी प्रश्न विचारत असत.

लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतरच त्यांनी आपल्या नात्याचा खुलासा केला. दोघांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केले होते. कॅटरीना नववधूच्या वेशामध्ये खूपच सुंदर दिसत होती. कॅटरीना आणि विकी संबंधी कोणतीना कोणती बातमी नेहमी समोर येत असते.

सध्या एक बातमी अशी आहे जी खूपच ट्रेंडमध्ये आहे आणि याचे कारण आहे कॅटरीना. कॅटरीना सध्या प्रेग्नंट असल्याची बातमी समोर येत आहे. नुकतेच कॅटरीना कैफला एयरपोर्टवर स्पॉट केले गेले होते. कॅटरीनाने लाईट पिंक कलरचा सूट घातला होता आणि खूपच सुंदर दिसत होती. हा फोटो इंस्टाग्रामवर शेयर करताच लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.


अनेकांनी कॅटरीनाच्या प्रेग्नंसीबद्दल प्रश्न उपस्थित केले. कॅटरीना आणि विकीकडून कॅटरीनाच्या प्रेग्नंसीबद्दल कोणतीही बातमी समोर आलेली नाही. अभिनेत्री कॅटरीना कैफ लवकरच टायगर ३ मध्ये सलमान खान सोबत पाहायला मिळणार आहे. याशिवाय विकी कौशल देखील लवकरच सारा अली खान सोबत लुका छुपी २ मध्ये पाहायला मिळणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने