फॅशनच्या नावाखाली लोक काय करतील याचा काहीच नेम नाही. अशा मंडळींपैकी एक अभिनेत्री सध्या आपल्या विचित्र पेहरावामुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. आपण घरचे सामान खरेदी करण्यासाठी पिशव्या घेऊन जातो आणि अगदी साधेच कपडे घालतो.

पण या अभिनेत्रीने तर चक्क आपल्या सर्व मर्यादाच ओलांडल्या. कान्ये वेस्टची प्रेयसी म्हणून हि अभिनेत्री खूपच चर्चेमध्ये आली होती. ज्युलिया फॉक्स असे या अभिनेत्रीचे नाव आहे. ब्रेकअप नंतर जेव्हा ती सर्वांच्या समोर आली तेव्हा तिची फॅशन पाहून सर्वांच्या नजर तिच्यावरून हटू शकल्या नाहीत.

अशा प्रकारची फॅशन करून समोर येण्याची ज्युलियाची हि काही पहिलीच वेळ नाही तर याआधी देखील तिने अशी विचित्र फॅशन करून चाहत्यांना धक्के दिले आहेत. दरम्यान आता तिचे काही फोटो पुन्हा चर्चेमध्ये आले आहेत.

या फोटो मध्ये ती चक्क हातामध्ये जीन्स घेऊन फक्त अं’त’र्व’स्त्रां’मध्येच किराणा खरेदी करण्यासाठी जाताना पाहायला मिळत आहे. निदान किराणा खरेदी करण्यासाठी तर फॅशन बाजूला ठेवायची होती. अशी अपेक्षा तिचे हे फोटो पाहून नेटकरी करत आहेत.

या फोटोमध्ये तिने टू पीस लुकला महत्व दिले आहे. तर पिशवी म्हणून तिने चक्क जीन्सचा वापर केला आहे. अनेकवेळा सेलिब्रिटी फॅशनच्या नावाखाली सर्व मर्यादा ओलांडतात. ज्युलियाचा हा लुक त्यापैकीच असल्याचे आता तिचे फोटो पाहणारे म्हणत आहेत.


काळ्या रंगाच्या इ’न’र’वे’अरवर ज्युलियाने जॅकेट घातलेले पाहायला मिळत आहे. तर डेनिमचे बूट देखील घातले आहेत. हे तिचे सर्वात आवडीचे बूट असल्याचा खुलासा तिने याआधीच केला होता. पण तिचा हा लुक तिच्या चाहत्यांना आवडलेला आहे असे दिसत नाही.

अनेक जणांनी तिच्या या लुकमुळे तिला ट्रोल देखील केले आहे. फॅशनेबल कपडे वापरण्यात काही वावगे नाही पण ते इतकेहि फॅशनेबल नसावेत जेणेकरून मर्यादांचे पालन होणार नाही. अशीच प्रतिक्रिया सध्या नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने