साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर एनटीआर सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. नुकतेच त्याचा वाढदिवस होऊन गेला. आरआरआर चित्रपटामुळे तर ज्युनिअर एनटीआरचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले.

साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारा हा अभिनेता आता प्रत्येकाच्या गळ्यामधील ताईत बनला आहे. प्रसिद्ध सुपरस्टार असलेल्या या अभिनेत्यावर एकेकाळी खूपच गंभीर आरोप लागला होता. २० मे २०२२ रोजी ज्युनिअर एनटीआरने आपला ३९वा वाढदिवस साजरा केला.

ज्युनिअर एनटीआरचे पूर्ण नाव नंदमुरी तारक रामा राव असे आहे. स्टूडेंट नंबर १, राखी, टेंपर, जनता गराज, अरविंद सामेथा सारख्या चित्रपटामधून ज्युनिअर एनटीआरने अमाप लोकप्रियता मिळवली. आपल्या वेगळ्या अभिनयाच्या शैलीने त्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली.

नुकत्याच येऊन गेलेल्या आरआरआर चित्रपटानंतर तर ज्युनिअर एनटीआरला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. पण साउथच्या सुपरस्टारवर अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याचा बालविवाहाचा आरोप लागला होता.

२०११ मध्ये ज्युनिअर एनटीआरने एका तेलगु टीव्ही चॅनलच्या मालकाची मुलगी लक्ष्मी प्रनाथीसोबत लग्न करण्याचे ठरवले होते. प्रनाथी हि उद्योगपती नारने श्रीनिवास राव यांची मुलगी होती तर तिची आई आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भाची होती. २०११ मध्ये दोघांची एंगेजमेंट झाली.

एंगेजमेंट झाली त्यावेळी लक्ष्मी हि फक्त १७ वर्षांची होती. याची माहिती मिळताच विजयवाडा येथी वकील सिंगुलुरी शांती प्रसाद यांनी ज्युनिअर एनटीआरवर बालविवाहचा आरोप लावत तक्रार दाखल केली.

याबद्दल ज्युनिअर एनटीआर, चंद्राबाबू नायडू, श्रीनिवास राव यांना देखील नोटीस बजावण्यात आली. पण प्रनाथी १८ वर्षांची झाली आहे असे सांगितल्यानंतर या वादावर पडदा पडला. पुढे काही दिवसांनंतर म्हणजेच ५ मे २०११ मध्ये वाट पाहून लक्ष्मीसोबत लग्न केले.

त्यावेळी लक्ष्मी १८ वर्षांची होती. सध्या लक्ष्मी आणि ज्युनिअर एनटीआर यांना दोन मुले आहेत. विशेष म्हणजे हे लग्न देखील वेगळ्या कारणामुळे गाजले होते. असे म्हंटले जाते कि हे लग्न साउथमधील सर्वात महागड्या लग्नांपैकी एक होते. या लग्नावर तब्बल १०० करोड रुपये खर्च करण्यात आले होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने