दिनेश कार्तिकसाठी आईपीएल २०२२ खूपच लकी ठरले आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या १२ सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकने तब्बल ६८.५० च्या सरासरीने आणि तब्बल २०० च्या स्ट्राईक रेटने २७४ धावा बनवल्या आहेत. दिनेश कार्तिक आज हिरो आहे पण एक काळ असा होता कि तो हिरो पासून झिरो बनला होता.

दिनेश कार्तिक आपला जवळचा मित्र मुरली विजय आणि पत्नीपासून धोका खाल्ल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेला होता. याचा परिणाम त्याच्या खेळावर देखील झाला खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियामधून ड्रॉपदेखील केले गेले होते. त्याचबरोबर त्याला स्टेट टीम मधून देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

दिनेश कार्तिक आतून इतका खचला होता कि त्यांच्या आयुष्यामध्ये असा क्षण देखील आला होता कि त्याने आ’त्म’ह’त्या करण्याचे देखील ठरवले होते. २००७ मध्ये दिनेश कार्तिकने आपली लहानपणीची मैत्रीण निकिता बंजारा सोबत लग्न केले होते. तेव्हा दिनेश कार्तिक २१ वर्षांचा होता आणि तामिळनाडू टीम कडून खेळत होता. त्यावेळी तामिळनाडू टीमकडून मुरली विजय देखील खेळत होता.

दिनेश कार्तिक आणि मुरली विजय खूप जवळचे मित्र होते. याच दोस्तीमुळे एक दिवस दिनेश कार्तिकची पत्नी निकिता आणि मुरली विजयची भेट होते. इथूनच दोघांमध्ये जवळीक वाढते आणि बघता बघता दोघांची मैत्री प्रेमामध्ये बदलते. २०१२ मध्ये दिनेश कार्तिकला समजते कि त्याची पत्नी आणि त्याचा मित्र मुरली विजय दोघांचे अफेयर आहे.

ज्यानंतर दिनेश कार्तिकला निकिताला घटस्फोट द्यावा लागला. घटस्फोटानंतर निकिताने मुरली विजय सोबत लग्न केले पण दिनेश कार्तिक मनातून खूपच खचला होता आणि तो हळू हळू डिप्रेशनमध्ये गेला. याचा परिणाम त्याच्या खेळावर देखील झाला आणि त्याचबरोबर त्याने फिटनेस क्लास देखील बंद केले.

दिनेश कार्तिकने मनातून खचल्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. दिनेश कार्तिकचे फिटनेस कोच त्याला जबरदस्तीने फिटनेस क्लासला घेऊन गेले. हे तेच फिटनेस कँप होते जिथे भारताची टॉप स्कवैश प्लेयर दीपिका पल्लीकल देखील सराव करत होती.

दिनेश कार्तिकच्या परिस्थितीबद्दल जेव्हा दीपिका पल्लीकलला सर्व काही माहित झाले तेव्हा ती त्याची काउंसलिंग करू लागली. हळू हळू दीपिका पल्लीकलमुळे दिनेश कार्तिक डिप्रेशनमधून बाहेर आला. या दरम्यान दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल एकमेकांच्या प्रेमात पडले.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने