जगातील सर्वात प्रतिष्ठित ७५ व्या आंतरराष्ट्रीय कान चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये बच्चन कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. अभिनेता अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या पाहायला मिळाले.

पण हा आनंद फार काळ टिकून राहिला नाही. पुरस्कार सोहळ्यानंतर बच्चन कुटुंबीय त्वरित भारतामध्ये दाखल झाले. बच्चन कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबतीत स्वतः अभिषेकने एक पोस्ट शेयर करत याची माहिती दिली.

प्रसिद्ध सूट स्टायलिस्ट अकबर शाहपुरवाला यांचे निधन झाले आहे असे या पोस्टवरून दिसून येत आहे. अकबर आणि बच्चन कुटुंबीय यांचे खूप जवळचे संबंध होते. अमिताभ बच्चन हे अकबर यांच्याकडून सूट शिवून घेत असत.

अभिषेक लहान असताना त्याचा सर्वात पहिला सूट अकबर यांनीच शिवला होता. अकबर यांच्या निधनाने बच्चन कुटुंबीय खूपच भावूक झाले आहेत. अभिषेकने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून अकबर यांच्या सूट लेबलचा एक फोटो शेयर केला आहे.


अभिषेकने पुढे लिहिले आहे कि, घरी आल्यानंतर खूपच दुखद बातमी समजली. फिल्म इंडस्ट्रीमधील एक महान व्यक्ती अकबर शाहपुरवाला यांचे निधन झाल्याने समजले. मी त्यांना अंकल म्हणून हक मारत होतो.

त्यांनी माझ्या वडिलांचे अनेक सूट शिवून दिले आहेत. याशिवाय त्यांनी माझ्या चित्रपटासाठी देखील सूट शिवून दिले. त्यांनी मला शिवलेला पहिला सूट रेफ्युजी चित्रपटाच्या प्रीमिअरवेळी घातला होता.

ते मला नेहमी म्हणायचे कि सूटचे कापड कापणे म्हणजे फक्त शिवणकाम नव्हे तर त्यामध्ये भावना देखल लपलेल्या असतात. जेव्हा तू माझा सूट घालतोस तेव्हा त्यामधील प्रत्येक धागा, शिलाई हि खूपच प्रेमाने आणि आशीर्वादाने केलेली असते. माझ्यासाठी ते जगातील सर्वोत्कृष्ट सूट मेकर होते. अंकल तुमच्या आत्म्याला शांती मिळो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने