खेळ जगतामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू एंड्रयू साइमंड्सचे निधन झाले आहे. माहितीनुसार एंड्रयू साइमंड्सचे शनिवारी रात्री टाउन्सविलेमध्ये एका कार अपघातामध्ये निधन झाले. त्याला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले पण त्यामध्ये यश आले नाही. अपघातामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती.

एंड्रयू साइमंड्सच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये दुखाची लहर पसरली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचाच प्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्नचे निधन झाले होते. त्यानंतर हि घटना घडल्यामुळे क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

शहरापासून जवळजवळ ५० किलोमीटर वेस्टच्या हर्वे रेंजमध्ये रात्री १०.३० वाजता हा अपघात झाले. भरधाव वेगाने जाणारी गाडी पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला. गाडीमध्ये फक्त एंड्रयू साइमंड्स होता.

अपघात इतका जबर होता कि त्यामध्ये एंड्रयू साइमंड्सला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळावरून एंड्रयू साइमंड्सला एंबुलेंसद्वारे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही.

ऑस्ट्रेलियन खेळाडू एडम गिलक्रिस्टने याबद्दल दुख व्यक्त केले आहे. ४६ वर्षीय एंड्रयू साइमंड्सच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. एडम गिलक्रिस्ट दुख व्यक्त करताना म्हणाला कि हे खूपच वेदनादायक आहे.

हे वर्ष ऑस्ट्रेलियन खेळ जगतासाठी खूपच वेदनादायक ठरले आहे. याच वर्षी ऑस्ट्रेलियन खेळाडू रॉड मार्श आणि शेन वार्न चे देखील निधन झाले. तर एंड्रयू साइमंड्सच्या मृत्यूनंतर चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसला आहे. एंड्रयू साइमंड्सने ऑस्ट्रेलियासाठी २६ टेस्ट, १९८ वनडे आणि १२ T२० सामने खेळले आहेत. २००३ आणि २००७ मध्ये वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये त्याची महत्वपूर्ण भूमिका होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने