साउथच्या चित्रपटांनी सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हिंदीमध्ये डब केलेले चित्रपट सध्या चांगलाच गल्ला कमवत आहेत. नुकतेच आलेल्या पुष्पा, आरआरआर आणि नंतर आलेल्या केजीएफ २ चित्रपटांनी तर बॉलीवूडची झोपच उडवली आहे.
प्रेक्षक आता पुष्पा २ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे आणि त्यामध्ये भर म्हणजे पुष्पा २ चित्रपटाचे बजेट देखील वाढले आहे. त्याचबरोबर अल्लू अर्जुनच्या मानधनामध्ये देखील घसघशीत वाढ झाली आहे.
अभिनेता अल्लू अर्जुनने पुष्पा २ चित्रपटासाठी मोठी रक्कम वसूल केली आहे. पुष्पा १ चित्रपटाने विक्रमी कमाई करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. आता पुष्पा २ बॉक्स ऑफीसवरचे रेकोर्ड मोडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अल्लू अर्जुनच्या मानधनाबद्दल बोलायचे झाले तर त्याने हॉलीवूड आणि बॉलीवूड अभिनेत्यांना देखील मागे टाकले आहे. पुष्पा २ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने तब्बल १०० कोटी फी घेतली आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नाही. पण जर हि गोष्ट खरी असेल तर हि आतापर्यंत एका अभिनेत्याने घेतलेली सर्वात जास्त फी म्हणता येईल.
पुष्पा १ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने ३५ कोटी रुपये मानधन घेतले होते. हा चित्रपट हिट झाल्यामुळे अल्लू अर्जुनचे भाव देखील वाढले असेच म्हणायला हवे. पुष्पा २ चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे आणि यासाठी जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे.
चित्रपटाच्या पहिल्या भागाचे बजेट २०० कोटी रुपयांचे होते. पण आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे बजेट वाढले असून ते तब्बल ४०० कोटी रुपये झाले आहे. यामधील १०० कोटी रुपये हे फक्त अल्लू अर्जुनवर खर्च होणार आहे. पुष्पा २ चित्रपटामध्ये प्रेक्षकांना सर्वकाही बेस्ट पाहायला मिळणार आहे यामध्ये काही शंका नाही.
टिप्पणी पोस्ट करा