बॉलीवूडची गंगुबाई म्हणजेच आलिया भट्ट लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तिच्या चित्रपटांमधील उत्कृष्ठ अभिनयामुळे ती आज बॉलीवूडमधील लीडिंग अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ मध्ये स्टूडेंट ऑफ़ द ईयर चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

त्यानंतर आलियाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. गंगुबाई आणि RRR चित्रपटाच्या सफलतेनंतर बॉलीवूडच्या फिल्ममेकर्सच्या नजरेमध्ये आलियाचे स्थान आणखी बळकट झाले आहे. आलियाने गेल्याच महिन्यामध्ये आपल्या एका नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.

अनेक वर्षे रणवीर कपूरला डेट करत असलेल्या आलियाने १४ एप्रिल रोजी त्याच्यासोबत लग्न केले. रणबीर आणि आलियाचे लग्न बॉलीवूडच्या ग्रँड लग्नांपैकी एक होते. लग्नानंतर आता दोघेही आपापल्या कामावर परतले आहेत. एकीकडे जिथे रणबीर कपूर साउथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत शुटींगमध्ये व्यस्त आहे तर आलिया देखील रणबीर सिंह सोबत येणाऱ्या रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

लग्नानंतर आलियाचे नशीबच पालटले आहे. असे ऐकण्यात आले आहे कि आलिया भट्टला हॉलीवूडमधून ऑफर आली आहे. आलियाची हॉलीवूड डेब्यूची स्केडुलिंग देखील झाली आहे आणि बातमीनुसार आलिया भट्ट मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये UK ला जाणार आहे. आलियाच्या या चित्रपटाचे नाव Heart of Stone असे आहे ज्यामध्ये आलिया सोबत Gal Gadot आणि Jamie Dornan देखील पाहायला मिळणार आहेत.

प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन नंतर आता आलिया भट्टने देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे आणि ती हॉलीवूडमध्ये आपले नाव कमवण्याच्या तयारीत लागली आहे. आलियाच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे कि रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाचे शुटींग संपल्यानंतर ती UK ला जाणार आहे. बातमीनुसार आलिया भट्ट आपल्या हॉलीवूड डेब्यू साठी खूपच एक्ससिटेड आहे. याशिवाय आलिया भट्ट आपल्या आगामी येणाऱ्या चित्रपट बैजू बावरा आणि जीले जरा साठी देखील तयारी करत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने