बॉलीवूडमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांची लग्ने मोडल्यानंतर त्यांचा प्रेमावरचा विश्वास उठला नाही आणि त्यांनी स्वतःला दुसरी संधी देत लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. बॉलीवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत ज्यांनी घटस्फोट घेऊन वेगळे राहण्याचा निर्णय घेतला तर काहीजण घटस्फोट न घेताच वेगळे राहू लागले.

नातं तुटल्यानंतर लोकांचा खऱ्या प्रेमावरचा विश्वास उडाल्याचे क्वचितच पाहायला मिळते. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर देखील स्वतःला एक संधी देत आपल्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागल्या.

या अभिनेत्रींमध्ये सर्वात पहिले नाव येते ते मलायका अरोराचे. अरबाज खानसोबतचे १८ वर्षाचे नाते तोडत मलायकाने घटस्फोट घेतला आणि ती अर्जुन कपूर सोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली.

काम्या पंजाबीने पहिले लग्न बंटी नेगीशी केले होते. या लग्नातून तिला एक मुलगी देखील झाली आहे. काम्या आणि बंटीचे लग्न जवळपास १० वर्षे टिकले आणि ते २०१३ मध्ये घटस्फोट घेऊन वेगळे झाले. घटस्फोटानंतर काम्याने दिल्लीमधील उद्योगपती शलभ डांगसोबत लग्न केले. शलभ डांग देखील घटस्फोटीत आहे.

अभिनेत्री कलकीने केकलाने आणि चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांनी लग्न केले होते पण त्यांचे हे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले. यानंतर कलकीने गाय हर्षबर्गला डेट करण्यास सुरुवात केली. दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले आणि यादरम्यान कलकीने एका मुलीला जन्म दिला.

बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्जाने तिचा पती साहिल संघाला घटस्फोट देऊन सर्वांनाच चकित केले होते. त्यानंतर तिने वैभव रेखी सोबत लग्न केलं ज्यानंतर तिला एक मुलगा देखील झाला. रिपोर्टनुसार दिया मिर्जा लग्नाआधीच प्रेग्नंट राहिली होती.

२००२ मध्ये पूजा बत्राने सोनू अहलुवालियाशी लग्न केलं होत. जे फार काळ टिकलं नाही आणि दोघे वेगळे झाले. पूजा बत्रा आणि नवाब शाह सध्या लिव्ह इन मध्ये राहत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने