अभिनेत्री अदा शर्मा तिच्या ग्लॅमरस फोटो आणि फिटनेससाठी सोशल मिडियावर नेहमी चर्चेमध्ये राहत असते. अभिनेत्री अदा शर्माचा जन्म ११ मे १९९२ रोजी झाला होता. विक्रम भट्ट दिग्दर्शित १९२० या चित्रपटामधून तिची बॉलीवूडमध्ये एंट्री झाली होती.

या चित्रपटामध्ये तिने लिसाची भूमिका साकारली होती ज्याचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. त्यानंतर ती २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या हसी तो फसी या कॉमेडी चित्रपटामध्ये पाहायला मिळाली. पण हा चित्रपट तितकासा प्रभाव दाखवू शकला नाही.

त्यानंतर तिने आपला मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळवला. तिने तेलगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये देखील काम केले. अभिनेत्री अदा शर्माला फिल्म इंडस्ट्रीमधील एक फिट अभिनेत्री म्हणून देखील ओळखले जाते. ती नेहमी आपले वर्कआउट आणि डान्सचे व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर करत असते.

अदा शर्माचे वडील एस.एल. शर्मा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते तर तिची आई हि एक उत्कृष्ठ शास्त्रीय नृत्यांगना आहे. त्यामुळे तिला डान्सचे धडे लहानपणापासूनच मिळाले. अदाने दहावीत असतानाच ठरवले होते कि तिला अभिनेत्री व्हायचे आहे.

अभिनेत्री होण्यापूर्वी अदाने भरपूर संघर्ष केला. तिने अमेरिकेमध्ये जाऊन डान्स आणि अभिनयाचे शिक्षण देखील घेतले. अनेक ठिकाणी तिला नकाराचा सामना करावा लागला. १९२० चित्रपटामध्ये ब्रेक मिळाल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

२०१७ मध्ये आलेल्या कमांडो २ चित्रपटामधून ती बॉलीवूडमध्ये पुन्हा परतली. यामध्ये ती स्टंट करताना देखील पाहायला मिळाली. कमांडो ३ मध्ये देखील तिने उत्कृष्ट अभिनयाचे प्रदर्शन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने