मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वतःच्या हिम्मतीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकप्रिय असलेल्या अभिनेत्रींनी आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळामध्ये खूप संघर्ष केला आहे. त्यामुळेच त्या आज आपल्या करियरमध्ये यश उपभोगत आहेत. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी यशस्वी होण्यासाठी पडेल ती कामे केली.


सुप्रिया पाठारे: अभिनेत्री सुप्रिया पठारे तर सर्वांनाच माहिती असेल. आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांचा खळखळून हसवणारी सुप्रिया हिने लहानपणापासूनच अभिनय करण्यास सुरवात केली. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये तिने महत्वाची भूमिका साकारली आहे.

सुप्रिया लहानपणापसून कष्ट करत होती. नृत्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी लहानपणी तिने लोकांच्या घरामध्ये धुणीभांडी केली. त्यामधून मिळणाऱ्या पैशांमधून तिने नृत्याचे क्लास लावले.


अर्चना नेवरेकर: अर्चना नेवरेकर हि सुप्रिया पाठारेची लहान बहिण आहे. सुप्रिया प्रमाणेच अर्चना देखील लोकप्रिय अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक चांगली निर्माती म्हणून देखील ओळखली जाते. लहान असताना अर्चनाने देखील सुप्रियाप्रमाणे कष्ट केले. आज ती मराठी कलाविश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती आहे.

सिया पाटील: सिया पाटील सध्या खूपच चर्चेमध्ये राहत असते. झक मारली बायको केली, कॅश करुनी अॅश करू, चल गंमत करू, नवरा माझ्या बायकोचा, भागम भाग, अपना सपना बोंबाबोंब, बाप रे बाप अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने महत्वाची भूमिका साकारली आहे.


सियाने मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे पण यासाठी तिला खूप कष्ट घ्यावे लागले. सियाचा जन्म सांगली जिल्ह्यातील राजेवाडी गावामध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ती दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्लास घेऊन संध्याकाळी पेट्रोल पंपावर काम करायची.


नेहा खान: मराठी सिने इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री नेहा खान आपल्याला शिकारी चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. शिकारी चित्रपटामधून तिने आपल्या करियरची सुरुवात केली. नेहा एक अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर ती एक उत्कृष्ठ नृत्यांगना देखील आहे. नेहाने अत्यंत हलाखीची परिस्थिती पाहिली आहे. तिने अनेकांच्या घरी धुणीभांडी केली आहेत. इतकेच नाही तर तिने दुध देखील विकेले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने