कोणत्याही व्यक्तीसोबत आयुष्यभर सोबत राहण्यासाठी लग्न करण्याचा रिवाज अनेक वर्षांपासून चालत आला आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे किंवा देशाचे असो लग्न प्रत्येक ठिकाणी लाईफपार्टनर सोबत आधिकारिक रूपाने जीवन जगण्यासाठी अनिवार्य असते.

सध्या भारतामध्ये लग्नाचा सीजन चालू आहे. अशामध्ये तुम्ही वेगवेगळ्याप्रकारचे लग्न पाहिले असेल. भारतामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या लग्नाबद्दल तुम्हाला माहिती असेल. इतकेच नाही तर विदेशामध्ये होणाऱ्या लग्नाबद्दल देखील टीव्हीवर पाहिले असेल. जगभरामध्ये होणाऱ्या अशा लग्नामध्ये रितीरिवाज देखील वेगवेगळे असतात आणि त्याचे पालन देखील केले जाते.

आज आपण अशाच एका अनोख्या लग्नाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये असणाऱ्या एका रिवाजाबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील चक्रावून जाल. या रिवाजानुसार नवीन जोडपे तीन दिवस टॉयलेटला जाऊ शकत नाही.

होय तुम्ही जे वाचता आहात ते खरे आहे. इथे लग्नाच्या दिवसापासून ते पुढच्या तीन दिवसांपर्यंत नवीन जोडप्याला टॉयलेटला जाण्यास पाबंदी असते. वास्तविक या विचित्र रिवाजाचे पालन इंडोनेशियामधील टीडॉन्ग समुदायाचे लोक करतात. या समुदायाचे लोक या रिवाजाला विशेष महत्व देतात.

आता अशामध्ये तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल कि नवीन जोडप्याला टॉयलेटला जाण्यापासून का रोखले जाते. चला तर जाणून घेऊया यामाघील कारण. या समुदायामधील लोकांचे असे म्हणणे आहे कि लग्न एक पवित्र समारंभ असतो. अशामध्ये जेव्हा नवरा-नवरी लग्नानंतर टॉयलेटला जातात तेव्हा याची पवित्रता भंग होते.

त्याचबरोबर जर कोणी असे करते तर तो मोठा अपशकून मानला जातो. फक्त एवढेच कारण आहे कि या रीवाजामुळे नवरा-नवरी तीन दिवस टॉयलेटला जाऊ शकत नाहीत. टीडॉन्ग समुदायाचे असे देखील म्हणणे आहे कि टॉयलेट एक अशी जागा आहे जी अनेक लोक वापरतात.

इथे लोक आपल्या शरीरामधील घाण टाकतात. ज्यामुळे या ठिकाणी नकारात्मक शक्ती पसरते. अशामध्ये जर नवरा-नवरी टॉयलेटचा वापर करत असतील तर नकारात्मक शक्ती त्यांच्यामध्ये समावीत होते आणि त्यांच्या विवाहित जीवनामध्ये अनेक समस्या येऊ लागतात. टॉयलेटला जाण्यापासून वाचण्यासाठी लग्नानंतर तीन दिवस नवरा-नवरीला खूपच कमी जेवण दिले जाते जेणेकरून टॉयलेटपासून दूर राहतील आणि अपशकून देखील होणार नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने