साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांना दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक मानले जाते. साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांना २१ वर्षे झाली आहेत. एसएस राजामौली यांनी अनेक उत्कृष्ठ चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये बाहुबली आणि RRR सारखे चित्रपट आहेत.

दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी जवळ जवळ १२ चित्रपट केले आहेत आणि त्यांचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले आहेत. बाहुबली आणि बाहुबली २ हे दोन चित्रपट त्यांच्या करियरमधील सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरले आहेत. दरम्यान एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. राजामौली यांनी एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

एसएस राजामौली यांच्या संपत्ती बद्दल बोलायचे झाले तर त्यांचे हैदराबादमध्ये एक आलिशान घर आहे आणि ते जास्तकरून इथेच राहतात. हैदराबादमधील बंजारा हिल येथे त्यांचा आलिशान बंगला स्थित आहे. २००८ मध्ये त्यांनी हा बंगला खरेदी केला होता. शिवाय राजमौली यांच्या देशभरामध्ये देखील अनेक ठिकाणी मालमत्ता आहेत.

एसएस राजामौली यांना कारची देखील खूप आवड आहे. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये जगातील सर्वात महागड्या ब्रँडच्या कारचा समावेश आहे. त्यांच्या कारच्या ताफ्यामध्ये रेंज रोव्हर आणि बीएमडब्ल्यू गाड्यांचा देखील समावेश आहे, ज्याची किंमत १ करोड ते १.५ करोडच्या आसपास आहे.

एसएस राजामौली हे एकूण 20 मिलियन डॉलर्सचे मालक आहेत. भारतीय चलनानुसार हा आकडा १४८ करोडच्या आसपास जातो. एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमविला असून आतापर्यंत आकडा हा जवळ जवळ ७०० करोडच्या आसपास गेला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने